शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

सतेज-महाडिक लढतीसाठी मतदारांकडून देव पाण्यात

By admin | Updated: November 24, 2015 00:22 IST

विधानपरिषद निवडणूक

गणपती कोळी -- कुरुंदवाड -विधानपरिषदेची निवडणूक म्हणजे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची दिवाळीच असते. मर्यादित मतदार असलेल्या या निवडणुकीत जितकी चुरस, तितके मताला मूल्य अधिक. त्यामध्ये महादेवराव महाडिक असतील तर निवडणुकीत रंग अधिक चढतो. कॉँग्रेसचे विद्यमान आमदार असलेले महादेवराव महाडिक या पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यात त्यांचे नाव मागे पडले असले तरी महाडिक यांनी स्पर्धेतून बाहेर तर पडू नये. याशिवाय ‘सतेज व महाडिक’ अशीच लढत लागावी, यासाठी अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत.सध्या विधानपरिषद निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून, जिल्ह्यातील मातब्बर मंडळींना उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत. या निवडणुकीत थेट जनतेचा संबंध येत नसला तरी जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा हक्क असतो. यामध्ये महापालिका, नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती, असे सुमारे ३५० मतदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे मर्यादित मतदार असलेल्या मतदारांची दिवाळीच असते.या मतदारसंघातून आमदार महाडिक एकवेळा अपक्ष, तर सध्या कॉँग्रेसचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मतदार संख्येत कॉँग्रेसचे वर्चस्व असल्याने कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक मातब्बर मंडळींचे अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न चालू आहेत. त्यामध्ये महाडिक व सतेज पाटील आघाडीवर असून, उमेदवारी मिळण्यापूर्वीच निवडणूक लढविण्याच्या ईर्ष्येने दोघांनीही प्रत्येक तालुक्यात जाऊन मतदारांची भेट घेऊन चर्चा केली आहे. दोन्ही उमेदवारांची पारंपरिक राजकीय ईर्ष्या मोठी असल्याने त्यांच्यात लढत लागली तर मतदारांना ‘मूँँह मागे दाम’ मिळणार आहे. त्यामुळे मतदारांच्या आशा रुंदावल्या आहेत. गत निवडणुकीत प्रत्येक मताला पाच लाखांचा गेलेला आकडा यंदा दहा लाखांच्या पुढे जाण्याची आशा आहे. त्यासाठी अनेक मतदारांनी येणाऱ्या निधीचा कसा विनियोग करावयाचा, याचेही आखाडे बांधले आहेत.महाडिक यांचे एकाच घरात तीन पक्ष असल्याने व नुकत्याच झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपशी आघाडी करून कॉँग्रेसला हात दाखविल्याने या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाकडून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता अधिक गडद आहे. मात्र, महाडिक आणि सतेज यांच्या वादाला पर्याय म्हणून पी. एन. पाटील यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत हवा काढून घेण्याची भीती मतदारांना लागली असून, कोणत्याही परिस्थितीत महाडिक यांनी माघार घेऊ नये व सतेज पाटील यांच्यातच लढत होऊन आपले स्वप्न सत्यात उतरावे, यासाठी अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. त्यामुळे मनोमनी इच्छा बाळगून राहिलेल्या या मतदारांना पाण्यातला देव कितपत पावतो? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.