शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

मतदारराजा आज देणार महाकौल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:35 IST

कोल्हापूर । लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज, सोमवारी ३३४२ केंद्रांवर मतदान होत आहे. सर्व दहा मतदार संघांत ...

कोल्हापूर । लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज, सोमवारी ३३४२ केंद्रांवर मतदान होत आहे. सर्व दहा मतदार संघांत १०६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतयंत्रात बंद होत आहे. सर्वच मतदार संघात प्रचंड चुरस असून लढती अटीतटीच्या होत आहेत. किमान पाच मतदार संघांत बंडखोर उमेदवारांमुळे महायुतीच्या उमेदवारांसमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. रविवारी दिवसभर पावसाने झोडपून काढले, त्यामुळे असाच पाऊस सुरु राहिला तर मतदारांना बाहेर कसे आणायचे, असे नवे संकट उमेदवारांसमोर आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, जनसुराज्यचे नेते विनय कोरे, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.कडेकोट बंदोबस्त५,५०० स्थानिक पोलीस, १००० होमगार्डस्, १० केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या, ओडिसा, कर्नाटक, मुंबई, दौंड, पुणे रेल्वे अतिरिक्त पोलीस बळ, याशिवाय दंगल काबू पथक, जलद कृती दल व बॉम्बशोध पथके तैनात रात्रं-दिवस गस्त,आकस्मिक नाकेबंदीजीपीएस यंत्रणा असलेल्यावाहनातून ईव्हीएम पोहोचविणारमतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँगरूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका वाहनातून भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील.मतदानासाठी ‘सुट्टी’सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेले दुकाने, आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे कामगार आयुक्तांनी कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था?ईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये १००२ व्हीव्हीपॅट, ६६८ कंट्रोल युनिट तर ७३४ बॅलेट युनिट अतिरिक्त उपलब्ध आहेत. सेक्टर आॅफिसरच्या गाडीमध्ये हे यंत्र सुरक्षित राहतील.मतदारांसाठी ३३४२ व्हीव्हीपॅटलोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच तीन हजार ३४२ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाºयांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.कुठे काही गडबड झाली तर काय?जिल्ह्यातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अवघ्या ५ ते ७ मिनिटांत शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ आणि एसआरपीएफची कंपनी तत्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाºयांवर कडक कारवाई करेल. सामेवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत पोलीस अधीक्षक (एसपी) ते पोलीस कॉन्स्टेबल (पीसी) असे सर्वच बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.