शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीचा घोळ मिटेना, अधिकारी गेले चक्रावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:46 IST

कोल्हापूर : प्रभाग रचना व आरक्षणाचे काम चांगले केले म्हणून कौतुकाचे धनी ठरलेले महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मतदार याद्या ...

कोल्हापूर : प्रभाग रचना व आरक्षणाचे काम चांगले केले म्हणून कौतुकाचे धनी ठरलेले महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मतदार याद्या तयार करण्याच्या कामात मात्र ‘फेल’ गेले आहेत. मतदार याद्यांवर आलेल्या भरमसाठ हरकती निकालात काढता काढता उत्तररात्रीपर्यंत अधिकारी जागत आहेत. एखादे काम बेजबाबदारपणे केले की त्याचा त्रास नंतर किती होतो याचा अनुभव ते घेत आहेत.

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. दि. १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. त्यावर दि. २३ फेब्रुवारीपर्यंत हरकती सादर करायच्या होत्या. या मुदतीत तब्बल १८०० हरकती दाखल झाल्या. एवढ्या मोठ्या संख्येने हरकती दाखल झाल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कामातील उथळपणा स्पष्ट झाला. दि. ३ मार्चपर्यंत अंतिम मतदार याद्या जाहीर करायच्या असल्यामुळे कमीत कमी वेळात १८०० हरकतींवर निर्णय घ्यायचा होता, प्रत्यक्षात क्षेत्रभेटी देऊन याद्या निर्दोष करायच्या होत्या; परंतु प्रारुप याद्याच चुकीच्या केल्या गेल्याचा परिणाम महापालिका प्रशासनाला भोगावे लागत आहेत.

प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या दि. २ मार्चपर्यंत तयार करून त्या आयोगाला सादर करायच्या होत्या; परंतु यादीतील घोळ काही केल्या मिटता मिटत नसल्याने ‘आज नाही उद्या’ आयोगाला पाठविणार आहोत, असे सांगण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. थोडा विलंब झाला तरी चालेल, पण निर्दोष याद्या तयार करून त्या आयोगाकडे पाठविण्यात येतील, असे उपायुक्त रविकांत आडसुळे यांनी बुधवारी सांगितले.