शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मतविभागणी ठरणार डोकेदुखी

By admin | Updated: October 2, 2014 00:16 IST

शेट्टींचा करिश्मा टिकणार का? : मानसिंगराव गायकवाड यांची भूमिका निर्णायक

राजाराम कांबळे- मलकापूर -शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र येथे विद्यमान आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील, कर्णसिंह गायकवाड व ‘स्वाभिमानी’चे अमर पाटील यांच्यात ‘कांटे की टक्कर’ होणार आहे. येथे मतविभागणीचा फटका विनय कोरे, तसेच सत्यजित पाटील यांना बसणार आहे. तर मानसिंगराव गायकवाड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. जनसुराज्य पक्षाचे विद्यमान आमदार विनय कोरे यांनी शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यादिवशी शक्तिप्रदर्शन केले आहे, तर सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी सरुड येथे सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेऊन कार्यकर्त्यांना ‘जागते रहो’चा आदेश दिला आहे. लोकसभेला या मतदारसंघातून ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी ४५ हजारांचे मताधिक्य घेऊन निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी ‘स्वाभिमानी’कडून अमर पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. ‘स्वाभिमानी’ची खरी ताकद या निवडणुकीत समजणार आहे. तसेच राष्ट्रवादीची या मतदारसंघावर पकड आहे. राष्ट्रवादीकडून बाबासो पाटील-आसुर्लेकर हे आपले नशीब अजमावत आहेत. कॉँग्रेसचे उमेदवार कर्णसिंह गायकवाड यांनी वाड्या-वस्त्या पिंजून काढून प्रचारात आघाडी घेतली आहे. मनसे, ब्लॅक पँथर, बहुजन समाज पार्टीचे उमेदवारही आपले नशीब अजमावत आहेत.येथे पक्षापेक्षा गटा-तटांच्या राजकारणाला चलती आहे. शाहूवाडी तालुक्यात सरुडकर, कर्णसिंह गायकवाड व मानसिंगराव गायकवाड गट मातब्बर आहेत. येथील राजकारण गटाभोवती केंद्रीत असते. गत निवडणुकीपासून आ. विनय कोरे गटाची ताकद वाढू लागली आहे. खुद्द शाहूवाडीतून स्थानिक दोन, तर पन्हाळा तालुक्यातून चार उमेदवार उभा आहेत. पन्हाळ्यातून नाराज असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य भारत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांच्या पक्षाचा उमेदवार उभा असला तरी त्यांचे कार्यकर्ते सेनेच्या प्रचारात आहेत. त्यामुळे मानसिंगराव गायकवाड यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आ. कोरे यांच्यासमोर मतविभागणीचा मोठा प्रसंग उभा आहे, तर एकेकाळी बाबासाहेब पाटील-सरुडकर गटाचे काम करणारे बाबासो पाटील-आसुर्लेकर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केल्याने सत्यजित पाटील यांनादेखील मतविभागणीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या रात्रीपर्यंत येथील वातावरण चांगलेच तापणार आहे. मात्र, आदल्या रात्री कोण-कोणाला पाठिंबा देणार? आतून मदत घेणार का? हे शेवटच्या दिवसापर्यंत कोणालाही कळणार नाही. मात्र, खरी लढत दुरंगी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शेवटी उमेदवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.