शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थान समिती अध्यक्षपदी विश्वविजय खानविलकर ?

By admin | Updated: November 10, 2015 23:33 IST

दिवाळीनंतर घोषणा : खानविलकर गटाला उभारी देण्याचा प्रयत्न

राजाराम लोंढे --कोल्हापूर -पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी युवा नेते विश्वविजय दिग्विजय खानविलकर यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या नियुक्तीला हिरवा कंदील दाखविला असून, या माध्यमातून खानविलकर गटाला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे. त्याच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्र्याचा दर्जा असल्याने या पदासाठी नेहमीच चढाओढ असते. यापूर्वी कॉँग्रेसचे अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांनी अध्यक्ष म्हणून काम केले होते; पण अ‍ॅड. घोरपडे यांची मुदत जून २०१० मध्ये संपली आहे. तेव्हापासून दोन वर्षे हे पद रिक्त होते. त्यानंतर गेली तीन वर्षे जिल्हाधिकाऱ्यांकडे या अध्यक्षपदाचा कार्यभार आहे. आघाडी सरकारच्या कालावधीत अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. सुरेश कुराडे, संजय डी. पाटील, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे यांनी प्रयत्न सुरू केले होते. विधानसभा निवडणुकीवेळी अ‍ॅड. कुराडे व संजय पाटील यांच्या नावांवर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जोरदार प्रयत्न झाले; पण अध्यक्षपदाचा तिढा सुटेपर्यंत निवडणूक लागली. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर देवस्थान समिती भाजपकडे आली. त्यानंतर अध्यक्षपदासाठी पहिल्यांदा भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू होती; पण त्यांनी यासाठी नकार दिल्यानंतर इतरांनी मोर्चेबांधणी लावली. आमदार मुश्रीफ यांना शह देण्यासाठी दिवंगत नेते, माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांना अध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू होत्या; पण त्यांच्या निधनामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर घाटगे यांचे सुपुत्र समरजितसिंह घाटगे, अ‍ॅड. संपतराव पवार व विश्वविजय खानविलकर यांच्या नावांची चर्चा सुरू झाली. ‘शाहू’ समूहाचा व्याप पाहता ही जबाबदारी आपणाला शक्य होणार नाही, असे घाटगे यांनी सांगितल्यानंतर खानविलकर यांचे नाव पुढे आले. खानविलकर यांनी विधानसभा,महापालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार केला आहे. तसेच स्व. दिग्विजय खानविलकर व नितीन गडकरी यांचे मैत्रीचे सबंध सर्वश्रुत होते. गडकरी यांच्यामुळेच विश्वविजय हे भाजपमध्ये आले आहेत. कायद्याची पदवी अभिप्रेतदेवस्थान समितीचे आतापर्यंतचे अध्यक्ष हे कायद्याची पदवी घेतलेलेच झालेत. हा विभाग विधी व न्याय विभागाच्या अंतर्गत येतो. त्याचबरोबर देवस्थानच्या ३२ हजार हेक्टर जमिनी आहेत, त्यामध्ये कायदेशीर गुंतागुंती आहेत. त्यामुळे येथे कायद्याचे ज्ञान असणारा अध्यक्ष असावा, असे संकेत आहेत. या पदावरील व्यक्ती वकीलच असावी असे नाही. खजिनदारपदही रिक्तविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सदस्यपदाच्या रिक्त जागांवर संगीता खाडे व बी. एन. पाटील-मुगळीकर यांची वर्णी लागली; पण अध्यक्षपदाबरोबर खजिनदारपदही रिक्त राहिले. आघाडी सरकारच्या काळात बाळासाहेब कुपेकर खजानीस होते. या ठिकाणी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली जाऊ शकते.