शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विश्रामबाग-कुपवाड रस्ता आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2016 00:24 IST

उड्डाण पुलाचे काम सुरू : वीस कोटींचा निधी मंजूर; वर्षभरासाठी दुसऱ्या मार्गे वाहतूक

सांगली : विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक इतर मार्गावर वळविण्यात आली आहे. तसे फलकही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विश्रामबाग व लक्ष्मी देऊळ परिसरात लावण्यात आले आहेत. शुक्रवारपासून एक वर्षासाठी हा रस्ता बंद राहणार आहे. विश्रामबाग ते लक्ष्मी देऊळ हा शहरातील वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून कुपवाड, वसंतदादा कारखाना, यशवंतनगर, अहिल्यानगर परिसराकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. शिवाय कुपवाड औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर विश्रामबाग चौकापासून थोड्याच अंतरावर रेल्वे गेट आहे. मिरज-पुणे रेल्वे मार्गावर रेल्वे फेऱ्यांची संख्याही अधिक असल्याने रेल्वेच्या वेळेत वारंवार वाहतुकीची कोंडी होते. या रस्त्यालाच पर्यायी रस्ता असलेल्या सह्याद्रीनगरमध्ये रेल्वे उड्डाण पूल आहे. त्यामुळे विश्रामबाग रेल्वे गेटवर उड्डाण पूल करण्यात मोठ्या अडचणी होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी उड्डाण पुलाची मागणी होती. पण तांत्रिक कारणामुळे मंजुरीत अडथळे येत होते. अखेर चार-पाच महिन्यापूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात येथील उड्डाण पुलाचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यासाठी राज्य शासन व रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येकी पन्नास टक्के हिस्सा आहे. नुकतीच त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, येत्या एक ते दोन दिवसात प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. या कामाची मुदत एक वर्षाची आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता वाहतुकीला बंद केला आहे. तसे फलकही या रस्त्यावर लावले आहेत. एक वर्षासाठी हा रस्ता बंद राहणार आहे. (प्रतिनिधी)सह्याद्रीनगरमार्गे वाहतूक विश्रामबाग ते लक्ष्मी देऊळ या रस्त्यावरील वाहतूक सह्याद्रीनगर रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. लक्ष्मी देवळाकडून सांगली-मिरज-विश्रामबागला जाण्यासाठी सह्याद्रीनगर उड्डाण पुलावरून जावे लागेल. तसेच सांगली-विश्रामबागमधून लक्ष्मी देऊळमार्गे कुपवाडला जाण्यासाठी याच रस्त्यावरून वाहतूक सुरू राहणार आहे. लक्ष्मी देवळापासून आणखी एक रस्ता विश्रामबागकडे सुरू करण्यात आला आहे. पण या रस्त्यावरून जड वाहतूक बंद राहणार आहे.