शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दूधगंगा, वारणेतून विसर्ग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

कोल्हापूर: पावसाचा जोर ओसरला असलातरी अधूनमधून येणाऱ्या जोरदार सरीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढच होत चालली आहे. सर्वच धरणातून कमी अधिक ...

कोल्हापूर: पावसाचा जोर ओसरला असलातरी अधूनमधून येणाऱ्या जोरदार सरीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढच होत चालली आहे. सर्वच धरणातून कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे नद्या अजूनही इशारा पातळीवरुनच वाहत असल्याने महापूर ओसरण्यास वेळ लागत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीवर २४ तासात अवघ्या दीड फुटाची घट झाली आहे. वारणा, दूधगंगा, चिकोत्रा धरणातून गुरुवारी विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

वारणा धरण ९१ टक्के भरल्याने ७ हजार ९८० वर असलेला विसर्ग १४ हजार ९८० क्यूसेसने वाढवण्यात आला आहे. दूधगंगा धरणाचा साठाही ८४ टक्केवर गेल्याने तेथून ३६०० क्यूसेस विसर्ग वाढवण्यात आला आहे. चिकोत्रा धरणही ९४ टक्के भरल्याने ५६० क्यूसेस पाण्याचा विसर्ग गुरुवारी संध्याकाळी सुरू करण्यात आला. धरणातून वाढवलेल्या विसर्गाने वारणा व दूधगंगा, वेदगंगेत जास्तीचे पाणी येऊन महापूर ओसरण्यास वेळ लागत आहे. राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून विद्युत विमोचकातून विसर्ग कायम आहे. शंभर टक्के भरलेल्या कडवी धरणातून विसर्ग वाढल्याने पंचगंगेच्या पाण्याला उतार कमी झाला असून अजूनही पाणीपातळी ३९ फूट या इशारा पातळीच्याही वर आहे.

आठवडाभर पावसाचा लहरीपणा

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. अधूनमधून एखाद दुसरी सर येत होती, त्यात फारसा जोर नव्हता. पुणे वेधशाळेनेे आज शुक्रवारी आणि उद्या शनिवारी रेड अलर्ट जारी केला असलातरी बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा झारखंड, राजस्थानकडे सरकल्याने दक्षिण भारतात मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाही. ६ व ७ ऑगस्टला पाऊस परतेल, पुन्हा आठवडाभर ओढ घेईल, असा सुधारित अंदाज आहे.

नदीकाठाला दुर्गंधी

पावसाची उघडझाप सुरू असल्याने महापूर ओसरण्यास वेळ लागत आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या अजूनही इशारा पातळीच्या वरच वाहत आहेत. दिवसाला एक फुटभरच पाणी कमी होत आहे. त्यात धरणातील विसर्गामुळे बऱ्यापैकी पाणी स्थिर राहिल्याचे दिसत आहे. पिके कुजत असल्याने नदीकाठाला आता दुर्गंधी सुटली आहे.

कोल्हापूर ते रत्नागिरी मार्ग बंदच

गुरुवारी संध्याकाळपर्यंत अजूनही ३७ बंधारे पाण्याखाली असून यावरून होणारी वाहतूक अन्य मार्गे सुरू आहे. कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग अजूनही बंदच आहे.

धरणातील पाणीसाठा (टक्केवारीमध्ये)

राधानगरी ९९, तुळशी ९२, वारणा ९३ , दूधगंगा ८४, कासारी ८१, आंबेओहोळ ८८, कुंभी ८४, पाटगाव ९१, चिकोत्रा ९४, जंगमहट्टी ९८, कडवी, चित्री, घटप्रभा, जांबरे, कोदे १०० टक्के

पाण्याखालील बंधारे

पंचगंगा: शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ

भोगावती: हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे,

तुळशी: बीड, आरे, बाचणी

वारणा: चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगाव, मांगले सावर्डे, तांदूळवाडी, चावरे, खोची, दानोळी

कुंभी: कळे, वेतवडे

कासारी: यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे आळवे

कडवी: सरुड पाटणे

वेदगंगा: कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली

दूधगंगा: दत्तवाड, बाचणी, सुळकूड, सिध्दनेर्ली