शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

वीरेंद्र तावडेला २१ ला न्यायालयात हजर करा

By admin | Updated: January 4, 2017 00:24 IST

न्यायालयाची सूचना : विनय पवार, सारंग अकोलकर यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला २१ जानेवारीला कोल्हापुरातील न्यायालयात हजर करण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी दिले. त्याचबरोबर या हत्येतील तिसरा संशयित आरोपी सातारा जिल्ह्यातील विनय पवार (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) व चौथा संशयित सारंग अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) या दोघांच्या अटकेची प्रक्रिया पोलिसांनी सुरू करावी, अशा सूचना बिलेही यांनी दिल्या. त्यामुळे समीर गायकवाड व तावडेची एकत्रित सुनावणी या दिवशी एकत्रित होणार आहे.मंगळवारी गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड व वीरेंद्रसिंह तावडे याच्या हजर अर्जावर बिले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. पानसरे हत्या प्रकरणातील तावडे याच्यावर डिसेंबर २०१६ ला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सध्या तावडे हा पुण्यातील येरवडा कारागृहात आहे. तावडेचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी तावडेला दोषारोपपत्रातील माहिती सांगायची आहे, तसेच हा खटला जिल्हा न्यायालयात वर्ग करायचा आहे. त्यामुळे तावडेला न्यायालयात हजर करावे, असा अर्ज दिला होता. या अर्जावर मंगळवारी बिले यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी बिले यांनी, तावडेला २१ जानेवारीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी, पानसरे हत्या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज) व सारंग दिलीप अकोलकर (रा.चिंतामणी अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे) अद्याप फरारी आहेत, असा युक्तिवाद केला. त्यावर या दोघांना पकडण्याचा अधिकार तपास यंत्रणेचा आहे. पवार व अकोलकर यांच्या अटकेची पोलिसांनी प्रक्रिया करावी, तसेच या दोघांची माहिती असलेले पत्रक शासकीय कार्यालय, शहरातील भित्तीपत्रकावर त्यांची माहिती लावावी तसेच वर्तमानपत्रांतही (वाँटेड) त्यांची माहिती द्यावयाचा अधिकार हा तपास यंत्रणेचा असल्याचे बिले यांनी सांगितले. दरम्यान, पानसरे खटल्यात आता अ‍ॅड. शिवाजीराव राणे हे काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)दोघेही पसार...संशयित विनय पवार व सारंग अकोलकर हे दोघेजण २००९ पासून पसार आहेत. ते अद्याप मिळून आलेले नाहीत. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात हे दोघे संशयित आरोपी आहेत. त्यामुळे पोलिस या प्रकरणात दोघांचा शोध घेत आहेत. चार्जफ्रेमवर सुनावणी...समीर गायकवाड याच्यावर डिसेंबर २०१५ ला न्यायालयात दोषारोपपत्र (चार्टशीट) दाखल झाले आहे; पण, अद्यापही दोषारोपपत्र निश्चित झालेले नाही. उच्च न्यायालयाने चार्र्जफ्रेम सुनावणी लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे न्यायालयाने २१ जानेवारीला चार्जफ्रेमवर ही सुनावणी होणार असल्याचे सांगितले.साप्ताहिक सनातन प्रभात मिळावे : समीर गायकवाड समीर गायकवाड हा मंगळवारी बिले यांच्या न्यायालयात हजर होता. त्यावेळी समीर गायकवाडचे वकील अ‍ॅड. पटवर्धन यांनी, साप्ताहिक सनातन प्रभात मिळावे, अशी त्याची मागणी असल्याचे यावेळी सांगितले.