शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी चषक : सहारा, एअर इंडियाची आगेकूच

By admin | Updated: April 21, 2017 00:27 IST

आकर्षित गोमलने ५० धावा केल्या. ए. जे. नाईट रायडर्सकडून सुयश कुलकर्णीने तीन, सुमित चव्हाण यांनी तीन बळी घेतले.

कोल्हापूर : मुंबईच्या एअर इंडिया संघाने ए. जे. नाईट रायडर्स संघावर; तर अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस्ने प्रदीप स्पोर्टस्चा पराभव करीत व्हीआयपी चषक क्रिकेट स्पर्धेत पुढील फेरी गाठली. शाहूपुरी जिमखाना मैदान येथे गुरुवारी एअर इंडिया व ए. जे. नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना एअर इंडिया संघाने ४० षटकांत ६ बाद २९४ धावा केल्या. यात धीरज जाधवने १०१ चेंडूंत नाबाद ९३ धावा केल्या. अजिंक्य पाटीलने ३४ चेंडंूत नाबाद ६४, तर रौनक शर्माने ५४, आकर्षित गोमलने ५० धावा केल्या. ए. जे. नाईट रायडर्सकडून सुयश कुलकर्णीने तीन, सुमित चव्हाण यांनी तीन बळी घेतले. उत्तरादाखल, खेळताना ए. जे. नाईट रायडर्स संघ ३२.५ षटकांत सर्वबाद १८७ धावांत गुंडाळला. यात सुमित चव्हाणने एकाकी झुंज देत ६४ चेंडंूत ७३ धावा केल्या. रौनक वर्माने तीन, बद्री आलन व वैभव माळी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. शास्त्रीनगर मैदानात प्रदीप स्पोर्टस् व अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना प्रदीप स्पोर्टस्चा संघ ३८.५ षटकांत सर्वबाद १९५ धावांत गुंडाळला. यात आदित्य शेमाडकरने ४९, तेजस बांदलने २८, जमाल एहसानने २६ धावा केल्या. गोलंदाजी करताना ‘मोगणे सहारा’कडून अनंत तांबवेकरने तीन, वैभव चौगुलेने दोन, भरत पुरोहित व अतीश वरपे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना मोगणे सहाराकडून विशाल कल्याणकरने २६ धावांत ५४ धावा केल्या; तर महेश मस्के यानेही तडाखेबंद फलंदाजी करीत ५५ चेंडंूत ६२ धावा करीत संघाला २८.२ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवून दिला. गोलंदाजी करताना प्रदीप स्पोर्टस्कडून महेश सपकाळ, मंगेश जाधव, प्रतीक छल्लर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. (प्रतिनिधी)