शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विनोद साबळे प्रथम क्रमांकाचे मानकरी

By admin | Updated: November 9, 2015 23:19 IST

‘लोकमत’ दीपोत्सव : दसरा-दिवाळी लकी ड्रॉ जाहीर; सणासुदीचा आनंद द्विगुणित

कोल्हापूर : दसरा व दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने व्यावसायिक व ग्राहकांचा दुहेरी फायदा करून देणाऱ्या ‘लोकमत दीपोत्सव २०१५’च्या दिवाळी सोडतीत विनोद साबळे प्रथम क्रमांकाचे भाग्यवान विजेते ठरले. त्यांना ३२ इंची एलईडी टीव्ही हे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. योजनेतील बक्षिसांचा दुसरा ‘लकी ड्रॉ’ नागाळा पार्क येथील ‘मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ’ यांच्या पेढीवर सोमवारी उत्साही वातावरणात काढण्यात आला.विविध व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची स्वतंत्रपणे व किफायतशीर दरात दसरा-दिवाळीदरम्यान जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करता यावे, तसेच ग्राहकांचाही सणाचा आनंद बक्षिसांनी द्विगुणित व्हावा यासाठी राजाकाका ई-मॉल आणि मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ प्रस्तुत ‘लोकमत’तर्फे ‘दीपोत्सव २०१५’ या योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेचे रॉयल ब्ल्यू मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, व्ही. काकडे सराफ, अ‍ॅक्वॉ क्रिस्टल, सुभाष फोटोज्, वारणा, जसवंत स्वीट्स हे प्रायोजक आहेत.चिपडे सराफ यांच्या नूतन पेढीवर अर्ना देशिंगकर या लहान मुलीच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचे बक्षीस काढण्यात आले, तर इतर बक्षिसे ‘चिपडे सराफ’चे मुरलीधर चिपडे, ‘सॅमसंग प्लाझा’चे गिरीष शहा, ‘जगदंब गारमेंट’चे मुरली रोहिडा, आर. एल. ज्वेलर्सचे सीईओ चंदन जैन, भूपेंद्र जैन, अ‍ॅक्वाकिस्टलचे सुशांत दोशी, ‘कदम बजाज’चे नीलेश कदम, ‘महालक्ष्मी होंडा’चे नितीन मिरजे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. ( प्रतिनिधी )‘लोकमत’मुळे दिवाळीचा सुखद धक्का बसला आहे. माझ्या ध्यानी- मनी सुध्दा नव्हते मला बक्षीस लागेल ते. मी मूळचा निपाणी येथील रहिवासी असून, कामानिमित्त कोल्हापूरला येतो. लोकमत दीपोत्सवमुळे माझ्याप्रमाणे अनेकांची दिवाळी अविस्मरणीय ठरत असल्याने मी ‘लोकमत’चे आभार मानतो. - विनोद साबळे , विजेते.बक्षीस वितरण सोमवारपासून.... बक्षीस विजेत्यांनी आपली बक्षिसे लकी ड्रॉ कुपन स्थळप्रत व ओळखपत्र दाखवून लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथून सोमवार (दि. १६)पासून १० दिवसांच्या आत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत घेऊन जावीत. उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्यांची नावे उद्या, बुधवारच्या अंकात प्रसिद्ध करण्यात येतील.