शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

विम्यानेही झिडकारले शेतकऱ्यांना

By admin | Updated: March 9, 2015 23:51 IST

जिल्ह्यातील स्थिती : शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचे भले; हप्त्याएवढीही भरपाई नाही

अशोक डोंबाळे - सांगली --विमा कंपन्यांच्या जाचक नियमांमुळे अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे शासनाने विमा कंपन्यांशी करार करताना शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचेच हित पाहिल्याचे विमा कंपन्यांच्या भरपाईवरून स्पष्ट होत आहे. खरीप २०१४ या हंगामामधील शेतकऱ्यांनी एक कोटी ८६ लाख ३२ हजार ४३ रूपयांचा विमा हप्ता भरून पिकांचा विमा उतरला होता. या पिकांचे ४३ कोटी ३० लाख १६ हजार ९७० रूपयांचे विमा संरक्षण होते. नैसर्गिक आपत्तीमुळे १८ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना दोन कोटी ६८ लाख सहा हजार ४० रूपयांची भरपाई मिळाली आहे. काही शेतकऱ्यांना तर विमा हप्त्यापेक्षाही कमी भरपाई मिळाल्यामुळे त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये व नगदी पिकांच्या उत्पादनावर खरीप हंगामात हवामानाच्या विविध घटकांचा मोठ्याप्रमाणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. म्हणूनच केंद्र शासनाने खरीप २०१४ पासून महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील हवामानावर आधारीत पिक विमा योजना सुरु केली आहे. सांगली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद या चार पिकांची निवड केली होती. या पिकांचे तीन कारणामुळे नुकसान झाले तर त्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी भरपाई द्यावी असे ठरले आहे. त्यानुसार विमा कंपनी, शासनाने प्रत्येक मंडलस्तरावर वेदर स्टेशन बसविली आहेत. दहा ते बारा गावांचे एक मंडल असल्यामुळे वेदर स्टेशन बसविलेल्या ठिकाणी पाऊस झाला नाही. उर्वरित गावामध्ये पाऊस झाला तरीही तो तेथे नोंदविला जात नाही. यामुळे तेथील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे. वायफळे येथील शेतकऱ्यांनी दोन लाख ८० हजार रूपये विमा हप्ता भरला होता. येथे पाऊसच न झाल्यामुळे खरीप ज्वारी, उडीद पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून ठोस भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, जिल्हा मध्यवर्ती बँकेने विमा कंपनीकडून आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना धक्काच बसला. केवळ ८० हजार रूपये त्यंना मिळाले. म्हणजे भरलेली रक्कमही शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. वायफळे येथीलच महादेव पाटील या शेतकऱ्याने उडीद पिकासाठी हेक्टरी शेतकरी हिस्सा म्हणून ६१६ रूपये आणि शासनाने २०५ रूपये विमा हप्ता भरला होता. विमा कंपनीकडून हेक्टरी अकराशे रूपये भरपाई मिळाली आहे. या रकमेतून शेतकऱ्यांच्या पदरात बियाणांची रक्कमही पडली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.ज्वारीचे नुकसान व भरपाईतालुकाक्षेत्र हेक्टरभरलेली रक्कममिळालेली भरपाईक़महांकाळ२०६९.३३२५ लाख ७४ हजारपाच लाख ७३ हजारकडेगाव२९३.२३दोन लाख ९० हजारएक लाख एक हजारखानापूर१०५३.१५१३ लाख १० हजारसात लाख ९४ हजारमिरज१२.४८१२ हजारसात हजारशिराळा१३.४६१० हजार१६ हजारतासगाव३८५.५६चार लाख ८० १८ हजारवाळवा११.५८१२ हजार१८ हजारबाजरीचे नुकसान आणि भरपाईची रक्कमतालुकाक्षेत्र हेक्टरभरलेली रक्कममिळालेली भरपाईआटपाडी२०८८.५३१९ लाख ६९ हजार ९० लाख ५२ हजारजत५५४२.७९५१ लाख ४१ हजार२३ लाख ३ हजारक़महांकाळ२००२.२९१८ लाख ८६ हजार००००खानापूर११७.०१७० हजार११ हजारमिरज३४.१९२२ हजार५४ हजारत्रुटींमुळे होते शेतकऱ्यांचे नुकसानविमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे अपुरा पाऊस, पावसातील खंड आणि अति पाऊस या तीन घटकांमुळे पिकांचे नुकसान झाले तरच त्यांना भरपाई मिळणार होती. हवामान यंत्रे बसविण्यातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. सांगली जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड केली होती. या विमा कंपनीकडे खरीप हंगाम २०१४ मध्ये जिल्ह्यातील ४० हजार २७४ शेतकऱ्यांनी एक कोटी ८६ लाख ३२ हजार ४३ रूपये विमा रक्कम भरून ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद पिकांचा विमा उतरला होता. या शेतकऱ्यांच्या पिकांसाठी ४३ कोटी ३० लाख १६ हजार ९७० रूपयांचे विमा संरक्षण होते. विमा मंजूर करण्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये नुकसान होऊनही त्यांना अपेक्षित भरपाई मिळाली नाही.