बुबनाळ : बुबनाळ (ता. शिरोळ) येथील एल. के.नगरमध्ये गटारी करण्याबाबत मागणी करूनही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा एल. के.नगरमधील रहिवाशांनी दिला आहे.
एल. के.नगरमध्ये गटारी नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सांडपाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरत आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे रहिवाशांनी गटारी करण्याबाबत मागणी करूनदेखील ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे मोर्चा काढून आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन सरपंच, ग्रामसेवक यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य विवेक राजमाने, बालेचाँद मकानदार, मेनुद्दीन उगारे, मल्लाप्पा कुमठे, कल्लाप्पा कुमठे, महादेवी राजमाने, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो - २६०३२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - बुबनाळ (ता. शिरोळ) येथील एल. के.नगरमध्ये सांडपाणी रस्त्यावर आल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.