शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भुदरगड तालुक्यातील रानमेव्यांना बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:12 IST

प्रक्रिया उद्योगांची गरज : कित्येक वर्षांच्या तालुकावासीयांच्या मागणीकडे शासनस्तरावरून डोळेझाक

बाजीराव जठार --वाघापूर --भुदरगड तालुक्यातील डोंगराळ भागात करवंदे, जांभूळ, काजू, आंबा, फणस, आळू, चिकण्या, तोरण, नेर्ली यासारख्या रानमेव्यांना बहर आला आहे. रानमेव्याला हक्काची बाजारपेठ मिळावी, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण व्हावेत, या कित्येक वर्षांच्या तालुकावासीयांच्या मागणीकडे शासन मात्र डोळेझाक करीत आहे. रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केल्यास यापासून लोणचे, मुरांबा, फणसपोळी, ज्युस, सुका मेवा यासारखे पदार्थ तयार करून ते बारमाही मिळण्याची सोय होईल; पण आज हा रानमेवा नाशवंत असल्याने व्यापारी व दलाल म्हणतील त्या भावाने द्यावा लागतो. दऱ्याखोऱ्यातून, डोंगरातून आणि काट्याकुट्यातून दिवसभर मेहनत घेऊन आणलेल्या या रानमेव्याचा कष्टकऱ्यांपेक्षा दलालांनाच जास्त फायदा होतो. यासाठी शासनाने या रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा केल्यास तालुक्यातील लोकांना रोजगार मिळेल. कच्च्या मालाच्या विक्रीतून ग्रामीण जनतेस थोडी कमाई होईल.रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करण्यासाठी शासनाची मदत हवी. मोठमोठ्या उद्योगांना सरकार लाखो रुपयांचे अनुदान देते; मात्र ग्रामीण भागातील उद्योगांकडे सोयिस्कर डोळेझाक करते. मग ग्रामीण जनता छोट्या-मोठ्या उद्योगाच्या प्रवाहात कशी येणार? असा प्रश्न तालुकावासीयांच्या मनात निर्माण होत आहे. भुदरगड तालुका संघाने रानमेव्यावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्याकडे तशी पूरक जागादेखील उपलब्ध आहे. तरी त्यांची मागणी असल्यास उद्योग उभारणीस सहकार व पणनच्या माध्यमातून चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आपण पाठपुरावा करू.- नाथाजी पाटील, भाजप तालुका अध्यक्ष (भुदरगड) व संचालक, बाजार समिती, कोल्हापूर. खासदार राजू शेट्टी यांच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यातील रानमेव्यावर प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. अशा पद्धतीचा उद्योग उभा केल्यास तालुक्यातील शेतकरी बांधवांना फळ उद्योगातून अधिक पैसे व रोजगार उपलब्ध होईल.- एकनाथ जठार, जिल्हा सरचिटणीस, स्वाभिमानी शेतकरी संघटना.