शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

दसरा चौकाजवळून गावठी पिस्तूल जप्त, एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी दसरा चौकातील के.एम.टी. बसस्टाॅपजवळ बेकायदेशीर गावठी पिस्तूल कब्जात बाळगून त्याची विक्री ...

कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी दसरा चौकातील के.एम.टी. बसस्टाॅपजवळ बेकायदेशीर गावठी पिस्तूल कब्जात बाळगून त्याची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणास सापळा रचून अटक केली. अक्षय अमर पाटील (वय २३, रा. डाकवे गल्ली, गौंडचाळ, कॅसेट ग्रुपजवळ, मंगळवारपेठ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूलसह एक जिवंत राऊंडही जप्त करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी येणारा दसरा सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्या संशयितांना शोधून त्यांच्याकडील हत्यारे व दारूगोळा जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी पथके तयार केली आहेत. स्वत: जाधव यांना गुप्त खबऱ्यामार्फत गुरुवारी एक तरुण दसरा चौकात गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दसरा चौकातील के.एम.टी. बसस्टाॅपजवळ सापळा रचण्यात आला. त्यात अलगदपणे संशयित अक्षय पाटील हा सापडला. त्याच्याकडून ५० हजार किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत राऊंड किंमत २०० रुपये असा एकूण ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याला मुद्देमालासह लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. शुक्रवारी संशयितास न्यायालयात हजर केले असता सोमवार (दि. २७)पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक किशोर डोंगरे, अंमलदार शिवाजी जामदार, नितीन चौथे, गुलाब चौगुले, अजय काळे, सुनील कवळेकर, महेश गवळी, रवींद्र कांबळे, औंकार परब, संजय पडवळ, अनिल जाधव, रफीक आवळकर, राजेंद्र वरंडेकर, महिला पोलीस अंमलदार नीलम कांबळे यांनी केली.

फोटो : २४०९२०२१-कोल-एलसीबी

ओळी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेकायदेशीर गावठी पिस्तूल विक्रीसाठी दसरा चौकात आलेल्या अक्षय मोरे यास पिस्तुलासह अटक केली.