वडणगे : वडणगे, ता. करवीर येथे महावितरणच्या कदमवाडी उपविभागाच्या वडणगे कार्यालयाच्या वतीने ‘एक गाव, एक दिवस’ अभियानाची सुरुवात करवीरचे आ. पी. एन. पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. या अभियानाद्वारे संबंधित भागातील विद्युत समस्या सोडविल्या जाणार आहेत. यावेळी पी. एन. पाटील म्हणाले, महावितरणने हे अभियान राबवून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. पाठपुरावा केल्याने वडणगे विभागातील शेती पंपाला दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले असून, लवकरच ही समस्या कायमची निकालात काढण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी महावितरण ग्रामीण १ चे कार्यकारी अभियंता दीपक पाटील, कदमवाडी उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विक्रांत सपाटे, जि.प.चे माजी सदस्य बी.एच. पाटील, पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील, सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सतीश पाटील, सेवा संस्था सभापती आनंदराव पाटील, भारत पाटील भुयेकर, शिवाजी कवठेकर आदींसह विद्युत कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते. यावेळी नवीन विद्युत जोडणीधारकांना विद्युत मीटरचे वाटप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
फोटो : २४ वडणगे महावितरण
ओळी :- वडणगे, ता. करवीर येथे विद्युत ग्राहकांना विद्युत मीटरचे वाटप करताना आ. पी. एन. पाटील, उपकार्य अभियंता विक्रांत सपाटे, कार्यकारी अभियंता दीपक पाटील, शिवाजी कवठेकर, पंचायत समिती सदस्य इंद्रजित पाटील, माजी जि. प. सदस्य बी. एच. पाटील, सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सतीश पाटील, सभापती आनंदराव पाटील आदी.
फोटो koldesk ला पाठविला आहे.