शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘कमळा’शिवाय विजयाची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:12 IST

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : भाजपचे नेते अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखालील आजरा शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपचे कमळ चिन्ह घेतले नाही म्हणून विरोधकांनी प्रचारात टीकेची झोड उठविली. मात्र, त्याबाबत मौन पाळून चराटी यांनी मुत्सद्दीपणे ‘कमळा’शिवाय विजयाची किमया साध्य केली. नगरपंचायतीच्या मंजुरीसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाची पोचपावतीच मतदारांनी विजयश्रीच्या स्वरूपात त्यांना ...

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : भाजपचे नेते अशोक चराटी यांच्या नेतृत्वाखालील आजरा शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपचे कमळ चिन्ह घेतले नाही म्हणून विरोधकांनी प्रचारात टीकेची झोड उठविली. मात्र, त्याबाबत मौन पाळून चराटी यांनी मुत्सद्दीपणे ‘कमळा’शिवाय विजयाची किमया साध्य केली. नगरपंचायतीच्या मंजुरीसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाची पोचपावतीच मतदारांनी विजयश्रीच्या स्वरूपात त्यांना दिली.मुंबई ते आजरा तब्बल ४० फेऱ्या मारून अशोक चराटी यांनी नगरपंचायत स्थापनेसाठी पाठपुरावा केला. त्यांच्यासह त्यांचे सहकारी विलास नाईक, विजयकुमार पाटील, दशरथ अमृते, अरुण देसाई, आदींची जिद्द पाहून खुद्द मुख्यमंत्र्यांना आजरा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा लागला.आजरा शहर विकास आघाडी आणि राष्ट्रवादी-काँग्रेस-सेना युती यांच्याच दुरंगी सामना होईल असे वाटत असताना मुस्लिम समाजातील काही प्रमुखांनी तिसºया आघाडीचे रणशिंग फुंकले. त्यात भाजपचे जुने कार्यकर्ते जनार्दन टोपले यांनीही उडी घेतली. त्यांना शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी साथ दिली.सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या राष्ट्रवादी-काँगे्रस-सेना आघाडीने आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार के . पी. पाटील यांच्या आक्रमक सभांमुळे प्रचारात आघाडी घेतली. ऐनवेळी रिंगणात उतरून देखील परिवर्तन आघाडीनेही हवा तयार केली. त्यामुळेच या निवडणुकीत चुरस झाली. मात्र, तिरंगी सामन्याचा फायदा चराटी यांनाच झाला.विरोधकांचा प्रचाराचा धडाका आणि हल्लाबोल होऊनही विरोधकांवर कोणतीही टीका न करता जिद्दीने मंजुरी मिळविलेल्या नगरपंचायतीचा मुद्दा घेऊन चराटी यांनी ‘घर टू घर’ प्रचार केला. त्यामुळेच आजरेकरांनी त्यांनाच साथ दिली.