कोल्हापूर : संभाजीनगरातील विजय यशवंत पाटील (वय ४४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
नलिनी घाटगे
कोल्हापूर : कसबा बावड्यातील नलिनी निवास घाटगे (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
येसाबाई पाटील
कोल्हापूर : कसबा आरळेतील येसाबाई राजाराम पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे. महालक्ष्मी सेवा सोसायटीचे संचालक अशोक राजाराम पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
संभाजीराव मोरे
कोल्हापूर : राजेंद्रनगरातील निवृत्त मंडल अधिकारी संभाजीराव दत्ताजीराव मोरे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सुमती वर्णे
कोल्हापूर : शनिवार पेठेतील सुमती सुभाषचंद्र वर्णे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
सुजाता पाटील
कोल्हापूर : नागाव (हातकणंगले)मधील सुजाता बाळासाहेब पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
द्रौपदी शिपेकर
कोल्हापूर : आंबेवाडी (ता. करवीर)तील द्रौपदी लक्ष्मण शिपेकर (वय ११२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्या नंदा शिपेकर यांच्या त्या सासू होत.
महावीर मूग
कोल्हापूर : खासबाग, मंगळवार पेठेतील महावीर अनंत मूग (वय ६७) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
विमल खोत
कोल्हापूर : पीरवाडी (ता. करवीर)तील विमल दत्तात्रय खोत (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.