शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संचालकांच्या प्रवास भत्त्यावर जोरदार चर्चा

By admin | Updated: September 18, 2016 00:35 IST

शेतकरी संघाची सभा : बदनामीबद्दल ‘गोकुळ’चा निषेध; बैल छाप मिश्रखत, औषध दुकान, पेट्रोल पंप सुरू करण्याची मागणी

कोल्हापूर : संचालक बैठक भत्त्यात तब्बल तीन लाख पाच हजारांची वाढ झाल्याचे निदर्शनास आणून देत नेमका भत्ता देता किती? अशी विचारणा करीत काही सभासदांनी हा विषय ताणून धरल्याने त्यावर जोरदार चर्चा झाली. शेतकरी संघाची बदनामी करणाऱ्या ‘गोकुळ’ प्रशासनाचा निषेध करीत, ‘गोकुळ’च्या संचालकांची चरण्याची कुरणे बंद होणार म्हणूनच आकांडतांडव सुरू असल्याचा आरोप जयसिंग हिर्डेकर यांनी केला. शेतकरी संघाची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी शाहू स्मारक भवनात झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष युवराज पाटील होते. गतवर्षी संचालक बैठक व प्रवास भत्त्यांवर तीन लाख ८२ हजार खर्च झाले. या वेळेला सहा लाख ८७ हजार रुपये कसा झाला? प्रत्येक संचालकाला किती भत्ता देता? अशी विचारणा आकाराम पाटील (पाडळी खुर्द) यांनी केली. जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीने ३७५ रुपये भत्ता देत असल्याचे सचिव आप्पासाहेब निर्मळ यांनी सांगितले. यावर हरकत घेत, सत्तारूढ मंडळींनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भत्ता घेणार नसल्याचे अभिवचन दिले होते, त्याचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करीत पाटील यांनी संचालकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. संचालकांची संख्या वाढल्याने भत्त्यात वाढ झाल्याचे निर्मळ यांनी सांगितले. एक कोटी नफा कमविणार तर त्याचा आराखडा काय? अशी विचारणा संभाजी जगदाळे (कोल्हापूर) यांनी केली. संघाच्या जागा भाड्याने दिल्या आहेत, नवीन शाखा सुरू करणार असल्याने कोटीपेक्षा अधिक नफा होईल, असा विश्वास अध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला. बाजार समित्यांच्या जोखडातून शेतकरी बाहेर पडला आहे, भाजीपाला खरेदी-विक्रीत संघाने उतरावे, अशी मागणी शिवाजीराव पोवार यांनी केली. गोडावून भाड्याने देताना जागरूकपणे करार करा, बैल छाप मिश्रखत सुरू करा, औषध दुकान, पेट्रोल पंप सुरू करण्याची मागणी सभासदांनी केली. ‘गोकुळ’च्या सभेत संघाची बदनामी केल्याचे निदर्शनास आणून देत, ‘संघ चालवावा तर शेतकरी संघ’ असा कारभार करण्याचे आवाहन भैया माने (कागल) यांनी केले. संचालकांची चरण्याची कुरणे बंद होणार म्हणून कारभाऱ्यांचे आकांडतांडव सुरू असल्याची टीका हिर्डेकर (बाजारभोगाव) यांनी केली. दिलीप खाडे (सांगरूळ), किरण पास्ते, नामदेव चांदणे (पिरळ) यांनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)नवखा आहे...: भुयेकरांकडून चिमटा व्यासपीठावरील संचालकांची नावे घेताना शशिकांत पाटील-चुयेकर यांचा उल्लेख करीत आनंदरावांचा चिरंजीव नवखा आहे; पण थोडा इकडे-तिकडे भरकटतोय, अशा शब्दांत बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी चिमटा काढला.