शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीने निवडणुकीचा ‘श्रीगणेशा’

By admin | Updated: October 1, 2015 00:44 IST

एकसदस्यीय प्रभाग रचनेकडे लक्ष : ई-इलेक्शनमुळे इच्छुकांची दमछाक होणार

संदीप बावचे-जयसिंगपूर --नोव्हेंबर २०१६ मध्ये होणाऱ्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्यावेळच्या संभाव्य लोकसंख्येला अनुसरून प्रभाग रचना तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर या निवडणुकीसाठी एकसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीचा अवलंब होणार असल्याचे संकेत आहेत. त्यातच राज्यात यापुढे ई-इलेक्शन पद्धतीने निवडणुका होणार असल्याचेही संकेत आहेत. दरम्यान, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १ आॅक्टोबरपासून मतदार यादी नोंदणी कार्यक्रमाबरोबर मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू होणार आहे. एकूणच मतदार यादी कार्यक्रमाच्या निमित्ताने निवडणुकीचा ‘श्रीगणेशा’ झाला आहे.डिसेंबर २०१६ मध्ये येथील नगरपालिकेची मुदत संपणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासनाला कार्यक्रम घेणे क्रमप्राप्त आहे. याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जयसिंगपूर शहरातील लोकसंख्येच्या आधारे प्रभाग रचना करण्याकरिता प्रारूप नकाशा गुगल मॅपवर टाकण्यासाठी एप्रिल २०१५ मध्ये नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या दहा वर्षांत वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता शहरातील नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. लोकसंख्येच्या आराखड्यानुसार तीन स्वीकृत नगरसेवक, असे मिळून २८ च्यावर नगरसेवकांची संख्या पोहोचणार आहे. नवीन होणारी प्रभाग रचना, प्रभागाचा अनुक्रम कोणत्या प्रकारे असावेत, याबाबत मात्र शासनाने गोपनीयता पाळली आहे. राज्यात यापुढे ई-इलेक्शन पद्धतीने निवडणुका होण्याचे संकेत आहेत. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये त्याची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आॅनलाईन अर्ज स्वीकारणे, गुगल मॅपवर प्रभाग रचना तयार करणे, प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्यासाठी खास सॉफ्टवेअर, निवडणुकींमध्ये अधिकाधिक संगणकीय तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न यापुढे होणार आहे. दरम्यान, १ आॅक्टोबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर झाला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्ययावतीचे काम शासनाकडून सुरू झाले आहे. यामुळे नगरपालिका निवडणुकीचा मतदार नोंदणी कार्यक्रमाच्यानिमित्ताने श्रीगणेशा झाला आहे.