शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
7
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
8
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
9
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
10
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
11
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
12
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
13
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
14
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
15
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
16
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
17
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
18
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
19
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
20
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

२७व्या रोजाने सामाजिक सलोख्याचे दर्शन

By admin | Updated: July 16, 2015 00:54 IST

इफ्तारमध्ये सर्वधर्मीयांचा सहभाग : पूर्वजांच्या प्रार्थनेसाठी कब्रस्तान परिसरात गर्दी--महिना रमजानचा सामाजिक सलोख्याचा !

एम. ए. पठाण - कोल्हापूर -रमजान महिन्यातील २७व्या रोजाचे मुस्लिम बांधवासमवेत अन्य धर्मीय समाजबांधवांनी पालन करून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले. शहरातील बाबूजमाल दर्गा परिसर तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांसमवेत अन्य धर्मीय बांधवांचा रोजा इफ्तारमधील सहभाग सामाजिक ऐक्य दर्शविणारा ठरला. मुस्लिम तिथीप्रमाणे रमजान महिन्यातील शेवटच्या टप्प्यातील रोजास २१ पासून प्रारंभ होतो. या रोजामध्ये मुस्लिम बांधव २१, २३, २५, २७, २९ तारखेला लैलतुल कद्र अर्थात शब-ए-कद्र या रात्रीचा शोध घेत असतात. बहुसंख्य धर्मगुरूंच्या मते ही रात्र सत्ताविसाव्या रात्री येते. या रात्रीमध्ये मुस्लिम बांधव अल्लाहाची आराधना व समाजाच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतात. तसेच वाईट कृत्याबद्दल क्षमा मागतात. शहरातील हजरत पीर बाबूजमाल दर्गा परिसरात सायंकाळी अन्य धर्मीय बांधव रोजा इफ्तारसाठी एकत्र आले होते. मस्जिद व दर्ग्यातर्फे बसण्याची, खाद्य पदार्थांची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे पन्हाळा येथील सादोबा दर्गा येथील मंडपात मुस्लिम बांधवांसमवेत अन्य धर्मीय रोजा इफ्तार करण्यासाठी जमा झाले होते. पन्हाळा तालुक्यातील मसुदमाले येथे शाही मस्जिद असून, हिंदू बांधव श्रद्धेने ‘मसुदमालेची पांढर’ असे संबोधतात. येथे अन्य धर्मीय २७ व्या रोजाचे इफ्तार करण्यासाठी एकत्र येत असतात. राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड, करवीर, तालुक्यांतही अन्य धर्मीय बांधवांची रोजा करण्याची व इफ्तारची लगबग पाहावयास मिळाली. यामध्ये लहान मुलांनी केलेल्या रोजाचेही आकर्षण होते. शहरातील मस्जिदीमध्ये तरावीह पठण करणाऱ्या हाफिजी, मौलाना, खिदमतगार, बागी यांना चंदा कमिटीकडून जमा झालेल्या निधीचे वाटप काल मंगळवारी रात्री करण्यात आले. रात्री मस्जिदीमध्ये विश्वशांती समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच काही ठिकाणी मसाले दूध, मिठाईचे वाटप करण्यात आले. बडी मस्जिदमध्ये मध्यरात्री दुआमुस्लिम बांधवांना अल्लाहच्या प्रार्थनेसाठी एकत्र आणण्याचे काम बिंदू चौकातील बडी मस्जिदकडून होत आहे. मंगळवारी रात्री सव्वाएक वाजता तसबीहचे पठण करून समस्त मानव जातीच्या उन्नतीसाठी दुआ करण्यात आली. त्यानंतर सहेरीची अर्थात जेवणाची व्यवस्था केली होती. कब्रस्तान परिसरात गर्दी मंगळवारी २७वी मोठी रात्र असल्याने आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना करण्यासाठी कब्रस्तान परिसरात मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती.