शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांच्या एकजुटीचा विजय निश्चित

By admin | Updated: October 21, 2015 00:40 IST

विनायक राऊत : शिवसेनेच्या अद्ययावत प्रचाराला प्रारंभ; भाजपला मूठमाती द्या

कोल्हापूर : शिवशाहीच्या तुतारीचा निनाद, कडकडणारी हलगी, ‘शिवसेना-शिवसेना’ची अंगात शिरशिरी आणणारी धून अशा वातावरणात शिवसेना उमेदवारांच्या अद्ययावत प्रचारयंत्रणेचा प्रारंभ झाला. येथील कोटितीर्थ तलावानजीकच्या श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शिवसैनिकांनी एकजूट केल्यास महापालिकेवर भगवा निश्चितच फडकेल, असा विश्वास यावेळी करण्यात आला. निवडणुकीत अभद्र युती करणाऱ्या भाजपला मूठमाती देण्याची वेळ आल्याचाही इशारा यावेळी खासदार राऊत यांनी दिला. या अद्ययावत प्रचार यंत्रणेत १० व्हिडिओ रथ, दोन सभेचे शिवरथ, प्रचारांच्या रिक्षा, आदींद्वारे प्रचार करण्यात येणार आहे. येथील स्वामी समर्थ मंदिरात देवदर्शन घेऊन शिवरथासमोर प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी शिव जयघोष करण्यात आला. प्रचार प्रारंभप्रसंगी खा. राऊत यांनी, भाजपवर टीकास्त्र सोडले. याशिवाय गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीने भ्रष्ट कारभार केल्याने जनताच त्यांना उत्तर देईल, जिल्ह्यातील काँग्रेस पूर्णत: संपल्याने त्यावर न बोललेलेच बरे, अशा शब्दांत त्यांनी तिघा विरोधकांचा समाचार घेतला. प्रास्ताविकात आमदार राजेश क्षीरसागर यांनी, ‘मातोश्री’वरून आलेल्या आदेशाचे पालन करून महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त शिवशाहीचे प्रशासन आणू, असे सांगितले. काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे, त्यांनी वेळीच आपली उमेदवारी मागे घेऊन पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनीही एकजुटीने शिवशाहीचा विजय संपादन करू, असे सांगितले. याप्रसंगी शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, प्रा. विजय कुलकर्णी, मुरलीधर जाधव, अ‍ॅड. पद्माकर कापसे, आदी उपस्थित होते. सर्व उमेदवार तसेच शिवसैनिक डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात भगवा स्कार्प अडकवून, तर काहीजण अंगात भगवे कपडे घालून प्रचारयंत्रणेत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)