शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

हातकणंगलेमुळेच ‘सत्तारूढ’चा विजय

By admin | Updated: April 23, 2015 00:54 IST

राजाराम कारखाना : भेंडवडे, सावर्डे, नरंदे, टोप, शिरोलीत एकतर्फी मतदान

आयुब मुल्ला-खोची राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाला आपली खुर्ची अबाधित ठेवण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे, सावर्डे, नरंदे, टोप, शिरोली, पेठवडगाव या गावांनीच भरघोस मदत केली. एकतर्फी मतदान करीत भेंडवडे, सावर्डे, नरंदे हेच तर आघाडीचे मानकरी ठरले. इथे थोडी जरी विरोधकांनी सावध भूमिका घेतली असती, तर मात्र चित्र वेगळे पाहावयास मिळाले असते.  कारखान्याच्या १२ हजार ६२४ सभासदांपैकी ४ हजार ८०० सभासद हातकणंगले तालुक्यातील आहेत. उर्वरित सभासद इतर सहा तालुक्यांतील आहेत. या सहा तालुक्यांतील सभासदांनी माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेलला ७० टक्क्यांच्या आसपास मतदान केले. हातकणंगले तालुक्यातील काही गावांनी समान ठेवले, तर परिवर्तनला थोडे मताधिक्यही दिले. यामध्ये कुंभोज व कोल्हापूर, सांगली रस्त्याच्या उजव्या बाजूकडील गावांचा समावेश आहे. या गावांनी सत्तारूढ गटाला अनपेक्षितरीत्या धक्का दिला; परंतु वडगाव परिसरातील चार गावांनीच सत्तारूढची एकतर्फी सोबत केली. विशेष म्हणजे, भेंडवडे गावातील १८० मते सत्तारूढला, तर परिवर्तनला फक्त दहा मते मिळाली. सत्तारूढचे उमेदवार सर्जेराव माने यांच्या व्यूहरचनेचा व उमेदवारीचा विक्रमी मताधिक्य घेण्यास फायदा झाला. हेच सर्जेराव माने गतवेळेला सत्तेज पाटील यांच्या पॅनेलमधून उभे होते; परंतु या परिसरारतील इतर उमेदवारांच्या तुलनेत मात्र त्यांनी थोडी कमी मते मिळाली. सतेज पाटील यांचा स्वत:चा गट नसल्यामुळे भेंडवडे, सावर्डे, नरंदे या गावांत पॅनेलला फटका बसला. आमदार महाडिक गटाने मात्र याच गावांवर अधिक भर देत प्रचाराची सर्व यंत्रणा राबविली. या गटात महाडिक यांना मानणारा गटही प्रबळ आहे. याचा फायदा त्यांना झाला. अंतिम टप्प्यापर्यंत सतेज पाटील यांनीही प्रचारासाठी या गावात बांधणी करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाह