शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, बेळगावची विजयी सलामी

By admin | Updated: November 18, 2015 00:33 IST

गडहिंग्लज युनायटेड करंडक : स्पर्धेचे अकरावे वर्ष; १६ संघांचा सहभाग

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात सांगली, यवतमाळ, हुबळी व बेळगाव संघांनी विजयी सलामी दिली. शहरातील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेला यंदा हसन मुश्रीफ फौंडेशन व महागावच्या संत गजानन शिक्षण समूहाने सहकार्य केले आहे.मुश्रीफ फौंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, शशिकांत चुयेकर, रमेश रेडेकर, सतीश घाळी, शिरीष गणाचारी, संभाजी शिवारे, आदी उपस्थित होते. राष्ट्रीय फुटबॉलपटू संदीप गोंधळी यांनी आणलेल्या क्रीडाज्योतीचे स्वागत सुनील चौगुले यांनी केले.सांगली फुटबॉल असोसिएशनने औरंगाबादच्या बजाज अ‍ॅटोचा ७-०ने धुव्वा उडविला. सांगलीच्या रोहित सातपुतेने स्पर्धेत गोलचे हॅट्ट्रिक करण्याचा मान मिळविला. औरंगाबादतर्फे सलीम नदाफ, रमेश गायकवाड यांनी उत्कृष्ट खेळ केला.यवतमाळ फे्रंडस् क्लबने बेळगावच्या एचएमडी स्पोर्टस्चा ३-१ ने पराभव केला. मध्यंतरापर्यंत सामना १-१ बरोबरीत होता. उत्तरार्धात यवतमाळच्या सलमान पिंजारीने सलग दोन गोल करून संघाला ३-१ ने विजय मिळवून दिला. बेळगावकडून मुदस्सर बेपारी, अन्सार अलवडकर यांनी उत्कृष्ट खेळ केला.तिसऱ्या सामन्यात बेळगावच्या तेराफेरा संघाने गडहिंग्लजच्या संभाजीराजे क्लबवर २-१ असा निसटता विजय मिळविला. गडहिंग्लजच्या राहुल पाटील याने दहाव्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. त्यानंतर बेळगावच्या पुनेद बेपारीने गोल करून सामना बरोबरीत आणला. सामन्यात उत्तरार्धात बेळगावच्या अभिषेक चेरेकरने मैदानी गोल करून सामना जिंकून दिला. गडहिंग्लजच्या रोहित सुतारने उत्कृष्ट खेळ केला.चौथ्या सामन्यात हुबळीच्या गांधीवाडा संघाने खानापूरच्या युनायटेडचा ३-१ ने पराभव केला. हुबळीने उत्तरार्धात आक्रमक खेळ करत सुनील जे, शशीकुमार, अमोघ वाय यांनी लागोपाठ तीन गोल नोंदवून विजय मिळविला. खानापूरकडून अक्षयने एकमेव गोल केला.उमेश कांबळे (बेळगाव), जी गिरीश तायवाडे (यवतमाळ), किरण चौकाशी (बेळगाव) यांना सामनावीर, तर साकोरे (औरंगाबाद), झिया मुजावर (बेळगाव), विशाल पाटील (गडहिंग्लज), अक्षय सी (खानापूर) यांना लढवय्या खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)