शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातही उष्माघातामुळे एकाचा बळी

By admin | Updated: April 3, 2017 08:08 IST

ल्हापुरातही उष्माघातामुळे एकाचा बळी गेला आहे. शामराव सुतार (वय 50 वर्ष) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 3 - कोल्हापुरातही उष्माघातामुळे एकाचा बळी गेला आहे.  शामराव सुतार (वय 50 वर्ष) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. ते कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरातील रहिवासी होती. दिवसभर फरशी बसवण्याचे काम केल्यानंतर शामराव रात्री कोल्हापुरातील शेळके पुलाच्या कट्ट्यावर बसले होते आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती आहे. स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
 
गेल्या काही दिवसांपासून चैत्रातील उन्हाचे चटके जाणवू लागले असून, वातावरणातील उष्म्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे लोकांच्या जीव कासावीस होतोय. मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र व कोकण-गोव्याच्या काही भागांत तापमाननं कमालीचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. 
 
शिवसेना नेत्याचा उष्माघाताने मृत्यू
गेल्या आठवड्यात नाशिकमधील शिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. निलेश गायकवाड असे त्यांचे नाव आहे. लासलगावाजवळील विंचूर येथील ही घटना आहे. उष्माघाताचा त्रास झाल्यानंतर त्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं. 
 
यंदाचे वर्ष उष्माघाताचे
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाचे वर्ष उष्णतेच्या लाटेचे असेल. यामुळे उष्माघाताच्या बळीची संख्या वाढण्याचा धोका आहे. यावर मात करण्यासाठी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि नगरपालिकांना तातडीचे पत्र लिहिले. या पत्रातील सूचनांच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने १७ उपाययोजना सुचविल्या आहेत.