शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्ष निवड शुक्रवारी

By admin | Updated: December 23, 2016 23:00 IST

जयसिंगपूर नगरपालिका : स्वीकृत सदस्यसंख्या तीन होणार; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरु

जयसिंगपूर : जयसिंगपूर उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी नगराध्यक्ष नीता माने यांनी ३० डिसेंबरला विशेष सभा आयोजित केली आहे. निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुकांचे लक्ष आता या सभेकडे लागले आहे. नगराध्यक्षांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्याने पालिकेत आता दोनऐवजी तीन स्वीकृत नगरसेवक संख्या होणार असल्यामुळे शाहू आघाडीला दोन स्वीकृत नगरसेवक निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. शासनाकडून नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्य व स्वीकृत सदस्यांची निवड करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये २५ दिवसांत बैठक बोलावण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, ३० डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन नगराध्यक्ष माने यांनी केले आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल होतील. १२ वाजता अर्जांची छाननी होऊन साडेबारापर्यंत अर्ज माघारीची मुदत ठेवण्यात आली असून, त्यानंतर मतदानप्रक्रिया होऊन उपनगराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. तर ३० डिसेंबर रोजीच स्वीकृत सदस्यांची घोषणा होणार आहे. दरम्यान, २६ डिसेंबरला या निवडी घेण्याच्या हालचाली झाल्या होत्या. मात्र, गुरुवारी रात्री याबाबत बदल होऊन ३० डिसेंबरला उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभा घेण्याचा निर्णय झाला. दरम्यान, उपनगराध्यक्ष पदासाठी महिला नगरसेवकाला शाहू आघाडीकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे या पदावर वर्णी कोणाची लागणार याकडे लक्ष लागले आहे. १३ सदस्यसंख्येमुळे शाहू आघाडीला दोन स्वीकृत सदस्य निवडण्याचे अधिकार मिळाले आहेत. संभाजी मोरे यांची स्वीकृत सदस्यपदी निवड निश्चित मानली जात असून, सा. रे. पाटील गटाकडून संधी कोणाला? याबाबत उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)‘शाहू’कडे दोन स्वीकृतनगराध्यक्षांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे सभागृहात २४ नगरसेवक व नगराध्यक्ष असे २५ संख्याबळ असणार आहे. शासनाकडून मिळालेल्या आदेशानुसार यापुढे सभागृहात तीन स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. सर्वाधिक तेरा सदस्यसंख्या असल्यामुळे शाहू आघाडीला दोन स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत; अशी माहिती मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी दिली.