शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वारणा योजना, वस्रोद्योगाच्या प्रश्नावर ठरणार मताधिक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:29 IST

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील विधानसभा मतदारसंघात गत निवडणुकीपेक्षा दोन टक्के जास्त मतदान झाले. खासदार राजू ...

अतुल आंबीलोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : येथील विधानसभा मतदारसंघात गत निवडणुकीपेक्षा दोन टक्के जास्त मतदान झाले. खासदार राजू शेट्टी व धैर्यशील माने यांच्यात थेट सामना पाहावयास मिळाला. या निवडणुकीत पाणीप्रश्नावरून विरोधकांनी शेट्टींना घेरले असले तरी शहराचा पाणीप्रश्न मीच सोडविणार, अशी ग्वाही देत शेट्टी यांनीही प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळे इचलकरंजीचे लीड (मताधिक्य) कोणाच्या बाजूने राहणार, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर या निवडणुकीतील गणितांवरच आगामी विधानसभा निवडणुकीची बेरीज-वजाबाकी अवलंबून राहणार आहे.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सन २०१४ साली६७ टक्के मतदान झाले होते. यंदा६९ टक्के मतदान झाले. झालेल्या एकूण मतदानापैकी ग्रामीण भागातील पाच गावांत शहराच्या तुलनेत फार कमी मतदान आहे. त्यामुळे शहराच्या मतदानावरच निवडणुकीचा कौल अवलंबून असतो.शहरामध्ये सुरुवातीपासूनच वारणा नळ पाणीपुरवठा योजना व वस्रोद्योगातील अडचणी या दोन मुद्द्यांवर खासदार शेट्टी यांना विरोधकांनी घेरले होते. परिणामी, सुरुवातीला संपूर्ण शहरात शेट्टीविरोधी वातावरण निर्माण झाले होते. प्रचाराच्या व सभांच्या माध्यमातून या दोन्ही मुद्द्यांना काही प्रमाणात खोडून काढण्यात शेट्टी व महाआघाडीतील नेत्यांना यश मिळाले असल्याचे सांगण्यात येत असले तरी निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.धैर्यशील माने यांनीही मतदारसंघात आमदार सुरेश हाळवणकर यांच्या माध्यमातून व शिवसेनेला सोबत घेत प्रचार यंत्रणा राबविली. त्यामध्ये ताराराणी आघाडीसह युतीतील घटक पक्ष सहभागी होते. त्यामुळे माने यांनाच या मतदारसंघातून अधिक मताधिक्य मिळेल, असे सांगितले जात आहे.या मतदारसंघात खासदार शेट्टी यांच्या बाजूने कॉँग्रेस, राष्टÑवादी, शाहू विकास आघाडी यासह महाआघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रचार यंत्रणेत सक्रिय सहभाग नोंदविला. मात्र, नेत्यांभोवतीच प्रचार यंत्रणा फिरल्याचे चित्र दिसले.धैयर्शील माने यांच्या प्रचारात प्रमुख पदाधिकारी यांच्यासह बुथ लेवल कार्यकर्त्यांपर्यंत प्रचार यंत्रणा सक्रिय दिसून आली. याचाही परिणाम मताधिक्यावर दिसून येणार आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांनीही टक्कर दिल्याचे दिसत होते. त्यामुळे ते किती मते घेणार यावरही मताधिक्य अवलंबून आहे. एकूणच चुरशीने झालेल्या निवडणुकीत कोणाची वर्णी लागणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.मतदारसंघातील सभाया मतदारसंघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे संस्थापक राज ठाकरे, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, प्रकाश आंबेडकर, अभिनेते प्रकाश राज, आदी मोठ्या सभा घेण्यात आल्या. याबरोबर आमदार सुरेश हाळवणकर तसेच दुसºया फळीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कोपरा सभा घेतल्या. प्रचाराच्या शेवट दिवशी पदयात्रा व मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली.