शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजुरांकडून वाहनधारक वेठीस

By admin | Updated: September 18, 2014 23:25 IST

उचलीसाठी लाखो रुपये : कायदेशीर मार्ग काढण्याची गरज

बालेचाँद हेरवाडे = पट्टणकोडोली -साखर कारखाने सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी ऊसतोड मजुरांना दिलेल्या रकमेची परतफेड झालेली नसताना, चालू वर्षीच्या गळीत हंगामासाठी बेभरवशाच्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांना उचल म्हणून पुन्हा लाखो रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना आर्थिक संकटाला सामारे जावे लागत आहे. अशीच मागील वर्षीची ऊसतोड मजुरांकडून परतफेड न झालेली रक्कम मागण्यासाठी जाणाऱ्या वाहनधारकांना मारहाण करण्याचे प्रकार टोळीकडून होत आहेत. पट्टणकोडोली परिसरात ऊस वाहतूक धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाहतूकदार पंचगंगा, शरद, दत्त, राजाराम, वारणा, शाहू, आणि जवाहर साखर कारखाना, आदी कारखान्यांसाठी ऊस वाहतुकीचे काम करतात. ऊसतोडणीसाठी मजूर म्हणून विजापूर, बीड, नगर, जत, अथणी, सांगोला, परभणी, आदी भागांतून मजुरांच्या टोळ्या ठरवितात. ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांना वाहतूकदारांकडून लाखो रुपये उचल म्हणून दिले जातात. मागील वर्षीच्या टोळ्यांना दिलेली रकमेची हंगामात परतफेड न झाल्याने चालू वर्षी पुन्हा टोळीसाठी उचल देण्यासाठी रक्कम जमवाजमव करताना वाहतूकदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक वर्षी टोळ्यांकडून फसवणूक होऊनही वाहतूकदार मजुरांना पैसे देत आहेत. चालू हंगाम सुरू होण्यापूर्वी काही वाहतूकदारांनी ऊसतोड मजुरांच्या भागात जाऊन रक्कम परत मागण्याचा प्रयत्न केला असता, तेथील स्थानिक लोक व ऊसतोड मजूर यांच्याकडून त्यांना मारहाणीचे प्रकार घडत आहेत.