शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चार माणसांमागे एक वाहन

By admin | Updated: January 19, 2015 00:31 IST

वाहने झाली उदंड : वर्षाला ५० हजार वाहने रस्त्यावर; दोन वाहने असलेली कुटुंबे अधिक

अंजर अथणीकर - सांगली जिल्ह्यामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वर्षाला किमान ५० हजार वाहने नव्याने रस्त्यावर येत आहेत. आज जिल्ह्यामध्ये ६ लाख ६८ हजार ४२२ वाहने आहेत. याचे जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण काढले असता, तब्बल चार माणसामागे एक इतके प्रमाण वाढले आहे. कुटुंबामध्ये किमान दोन वाहने, अशी संख्या झाली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षात वाहनांच्या विक्रीचा वेग वाढला आहे. वाहन विक्रेत्यांची सुलभ कर्ज पध्दती व गरज म्हणूनही वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. विशेषत: कार आणि दुचाकींची संख्या वेगाने वाढत आहे. सांगली जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे तीस लाख असून, वाहनांची संख्या ६ लाख ६८ हजार ४२२ इतकी आहे. त्यामुळे याचे माणसी प्रमाण जवळपास साडेचार लोकांमागे एक वाहन असे झाले आहे. वर्षाला ५० ते ५५ हजार वाहने नव्याने रस्त्यावर येत आहेत. प्रौढ लोकसंख्येचा विचार केला, तर तीन माणसांमागे एक वाहन असे प्रमाण होते.वाहनांची संख्या भरमसाट वाढल्याने विशेषत: शहरी भागात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक कुटुंबांना आता रात्रीच्या वेळी वाहन लावण्याची समस्या सतावत आहे. बहुतांशी अपार्टमेंटमध्ये पार्किंग व्यवस्था नसल्याने त्यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढत असून हे अपघात बहुतांशी वेळा मानवी चुकांमुळेच घडत आहेत. वाहन चालविताना सदैव वाहतूक नियमांचे पालन करण्याची दक्षता प्रत्येकानेच घेणे, आज काळाची गरज आहे. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात वाहनचालक व नागरिक यांच्यामध्ये जागृतीसाठी ११ ते २५ जानेवारी या कालावधित रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. दुचाकी, कारची संख्या वाढलीजिल्ह्यामध्ये दुचाकी आणि कारची संख्या वेगाने वाढत आहे. महिन्याला सुमारे चार हजार वाहने नव्याने रस्त्यावर येत असताना, यामध्ये दुचाकींची संख्या ही जवळपास तीन हजार आहे. त्यानंतर जीप, कार यांची संख्याही पाचशेहून अधिक आहे. मालवाहतुकीच्या छोट्या वाहनांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षभरात एकूण वाहनांच्या संख्येमध्ये दुचाकी ९.४६ टक्के, कार १२.२२ टक्के, जीप १२ टक्के, तर ट्रकच्या संख्येत ३.८२ टक्के वाढ झाली आहे. वर्षात तीनशे जणांचा अपघाती बळीएकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ३०० जण अपघातांमुळे दगावले आहेत. यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. अपंगत्व आलेल्यांची संख्याही हजारहून अधिक आहे. सुमारे दीड हजार अपघातांची वर्षभरात नोंद झाली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणे, मानवी चुका, त्याचबरोबर वाहन व रस्ते खराब आदी कारणे अपघात वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. सार्वजनिक वाहनांचा वापरही दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.१९८० मध्ये होते दहा हजार लोकांमागे एक वाहन गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या वेगाने वाढली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये १९८० मध्ये दहा हजार लोकांमागे केवळ एक वाहन होते. इतकी अल्प वाहनांची संख्या होती. आता साडेचार लोकांमागे एक वाहन झाले आहे. २००० पासून वाहनांचा वेग वाढला आहे. जिल्ह्यातील सध्याची वाहनांची संख्यादुचाकी : ५,0९,३५०कार : ५१,९८९जीप : १९,५६८ट्रक : ९०,0२१टँकर : ६८७डिलिव्हरी व्हॅन : २०,८८०ट्रॅक्टर : २५,३७२ट्रेलर : १८,0९८जेसीबी, क्रेन : १,0१०रिक्षा : ८,७०४४एकूण : ६,६८,४२२