शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला मुबलक तरीही गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली असून, भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली असून, भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारात भाजीपाल्याची आवक मुबलक होत असल्याने नागरिकांनी गर्दी करण्याची गरज नाही. बाजार समितीत रोज सरासरी तीन हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदी, मिनी लॉकडाऊनसह इतर कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, यातून जीवनाश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असले तरी भाजीपाला खरेदीसाठी सकाळी व सायंकाळी अक्षरश: झुंबड उडालेली पाहावयास मिळते. कोल्हापूर जिल्ह्यात भाज्यांची आवक चांगली आहे. उष्मा वाढला असला तरी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज तीन हजार क्विंटल भाज्यांची आवक होते. मंगळवार, गुरूवार, रविवारी तुलनेने भाज्यांची आवक कमी असते. त्याचबरोबर स्थानिक शेतकऱ्यांचा भाजीपालाही सध्या बाजारात येत आहे. कोल्हापूर शहरातील मंडई, चौक, फुटपाथसह विविध ठिकाणी शेतकरी भाजीपाला घेऊन बसलेले असतात. त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करण्याची गरजच नाही.

बाजार समितीत बुधवारी झालेली शेतमालाची आवक क्विंटलमध्ये

शेतमाल आवक

फळे ९६०

भाजीपाला ३०४४

कांदा ७३७१

बटाटा २३८१

लसूण २३२

कोट-

मिनी लॉकडाऊन असले तरी भाजीपाला, कांदा-बटाट्याच्या आवकेवर परिणाम नाही. भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने नागरिकांना गर्दी करण्याचे काहीच कारण नाही.

- जयवंत पाटील (सचिव, बाजार समिती)