शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

‘भाजीपाला अडत’ आंदोलन चिघळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 00:10 IST

अडत धोरणाचा निषेध : खरेदीदार उद्यापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात

कोल्हापूर : बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदारांचे आंदोलन चांगलेच चिघळले असून, कोणत्याही परिस्थितीत अडत देणार नाही, यावर ते ठाम राहिले आहेत. सरकारच्या अडत धोरणाविरोधात उद्या, सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषणाला बसण्याचा निर्णय खरेदीदार संघटनेने घेतला आहे. गेले चार दिवस सहा टक्के अडतीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. भाजीविक्रेत्यांची भूमिका ही शेतकरीविरोधी नसून दलालांच्या विरोधात आहे. आंदोलन शांततेत व कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था न बिघडविता सुरू आहे. उलट भाजी मंडईत शेतकऱ्यांना बसण्यास खरेदीदार सहकार्यच करीत आहेत; पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, बाजार समिती वारंवार काहीही कारण नसताना भाजी विक्रेत्यांच्या आंदोलनाला चिथावणी देऊन हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हीही विक्रेते या कोल्हापुरातीलच आहोत. आम्ही बोलण्यापेक्षा करून दाखवतो, असा इशारा संघटनेने पत्रकातून दिला आहे. ‘स्वाभिमानी’ला जशास तसे उत्तर देऊआमचे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे हे व्यापाऱ्यांना दमदाटी करीत आहेत; पण त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राजू जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. वळंजूंना खरेदीदारांबद्दल पोटशूळनंदकुमार वळंजू यांना गोरगरीब खरेदीदारांबद्दल पोटशूळ असल्याने ते आमच्या विरोधात बोलत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला. खरेदीदारांनी घेतली मुश्रीफ यांची भेट खरेदीदारांनी शनिवारी दुपारी आमदार हसन मुश्रीफ यांची जिल्हा बॅँकेत भेट घेतली. मुश्रीफ यांनी सभापती पाटील यांना बोलावून घेऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी खरेदीदार अडत न देण्यावर ठाम राहिल्याने काहीच मार्ग निघाला नाही. बाजार समितीला रोज ३० हजारांचा फटकाकोल्हापूर : भाजीपाला मार्केटमधील किरकोळ व्यापाऱ्यांच्या खरेदी बंदमुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला रोज ३० हजारांचा फटका बसत आहे. नियमित उलाढालीपेक्षा २५ ते ३० लाखांनी उलाढाल कमी झाल्याने त्याचा परिणाम समितीच्या उत्पन्नावर झाला आहे.बाजार समितीत स्थानिक भाजीपाल्यासह सांगली, सातारा, सोलापूर, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. साधारणत: रोज दोन हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक असते. भाजी मार्केटमध्ये लिलाव झाल्यानंतर कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील भाजीपाला खरेदीदार माल उचलतात. एकूण माल आवकेच्या तुलनेत ३० ते ४० टक्के माल स्थानिक व्यापारी खरेदी करतात. उर्वरित माल कोकण, गोव्याला पाठविला जातो; पण अडतीवरून व्यापारी व अडते यांच्यात वाद सुरू झाला आहे. बुधवारपासून शहर व ग्रामीण भागातील किरकोळ व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे मार्केटमधील आवक कमी झाली आहेच; पण उठावही घटला आहे. नियमित आवकेपेक्षा किमान ४० टक्के मालाची आवक कमी झाली आहे. भाजीपाला मार्केटमधील उलाढालीवर समितीला १ टक्का कर मिळतो. साधारणत: रोज २५ लाखांनी उलाढाल कमी झाल्याने त्यापोटी मिळणाऱ्या २५ हजार उत्पन्नात घट झाली आहे. त्याशिवाय समितीत येणाऱ्या चारचाकी वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारला जातो. त्याच्यापोटी किमान पाच हजार रुपये असे रोज ३० हजारांचे नुकसान सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे. भाजीपाल्याचा टेम्पो फोडलाबाजार समितीतून भाजीपाला भरून तो कोकणात घेऊन जाणारा टेम्पो शुक्रवारी (दि. ३) मध्यरात्री सोन्यामारुती चौकात अज्ञात व्यक्तींनी फोडला. याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, आमचा या फोडाफोडीशी संबंध नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. पोलिस बंदोबस्तात लक्ष्मीपुरी बाजार सुरू राहणार भाजीपाला अडतीवरून गेले चार दिवस निर्माण झालेल्या पेचाबाबत बाजार समिती संचालकांनी शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन चर्चा केली. आज, रविवारी लक्ष्मीपुरी बाजार बंद पाडण्याची खरेदीदारांनी धमकी दिल्याचे सांगत पोलिस बंदोबस्तात बाजार सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी डॉ. सैनी यांच्याकडे केली. शनिवारी दुपारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, समितीचे सभापती सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेऊन अडतीबाबतची वस्तुस्थिती सांगितली. कोणत्याही परिस्थितीत लक्ष्मीपुरी बाजार बंद राहणार नाही, याची दक्षता पोलिस प्रशासन घेईल, असे डॉ. सैनी यांनी सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांची भेट घेतली. तांबडे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना रविवारी आठवडी बाजारात पोलिस बंदोबस्त लावण्याच्या सूचना दिल्या.