शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

गडहिंग्लजमध्ये दिवसभर भाजी मार्केट बंद !

By admin | Updated: December 27, 2014 00:03 IST

आजपासून भाजीवाले मंडईतच : नगरपालिकेची कार्यवाही सुरू; नागरिकांची गैरसोय

गडहिंग्लज : मंडई व्यतिरिक्त शहरात अन्यत्र भाजीपाला विक्रीस बंदी घालावी या मागणीसाठी येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटमधील विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून दिवसभर बंद पाळला. त्यामुळे उद्या, शनिवारपासून शहरातील सर्व भाजी विक्रेत्यांना मंडईत हलविण्याच्या हालचाली युद्धपातळीवर सुरू झाल्या.सकाळपासूनच मंडईच्या प्रवेशद्वारावरच भाजी विक्रेत्यांनी ठिय्या मांडला होता. त्यांच्या बंदला गडहिंग्लज शहर गाळेधारक संघटना व हातगाडी-खोकीधारक संघटना यांच्यासह विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला. शहरात अन्यत्र बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना त्वरित न हलविल्यास मंडई बंद ठेवून नगरपालिकेसमोर बसून भाजी विकण्याचा इशारा देण्यात आला.नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, राष्ट्रवादीचे गटनेते रामदास कुराडे, नगरसेवक हारुण सय्यद, मुख्याधिकारी तानाजी नरळे, अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख प्रफुल्लकुमार वनखंडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप माने, गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष तानाजी मोहिते, हातगाडी- खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक दादू पाटील यांनी भाजी विक्रेत्यांच्या अडचणी मांडल्या.मंडईतील गाळेधारकांव्यतिरिक्त अन्य भाजीविक्रेते व शेतकऱ्यांच्या बैठकीची व्यवस्था तातडीने केली जाईल. सर्व विक्रेत्यांनी एकमेकांना सहकार्याची भूमिका ठेवावी, कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे स्पष्ट करून मंडईच्या स्वच्छतेसह भाजीवाल्यांच्या बैठकीची व्यवस्था तातडीने करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी प्रशासनाला केल्या. स्वत: दिवसभर थांबून मुख्याधिकाऱ्यांनी कार्यवाही केली.आंदोलनात नगरसेवक राजेश बोरगावे, बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर व उदय पाटील, भाजी मार्केट संघटनेचे अध्यक्ष शेखर चिंचेवाडी, उपाध्यक्ष शिवाजी कमते, सचिव रावसाहेब गार्इंगडे, अमोल हतरोटे, मुस्ताक मुल्ला, लिलावती देसाई, संगीता नेवडे, यशोदा गायकवाड, कस्तुरी तळेवाडी, आदींसह भाजी विक्रेते सहभागी झाले होते. दिवसभर मंडई बंद राहिल्यामुळे नागरिकांची कुचंबणा झाली. (प्रतिनिधी)‘लोकमत’कडून प्रकाशझोतचार दिवसांपूर्वी मंडईतील भाजी विक्रेत्यांनी पालिकेवर धडक मोर्चा मारून पदाधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली होती. त्यावेळी दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र त्याची पूर्तता न झाल्यामुळे भाजी विक्रेते आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे हा प्रश्न चिघळण्याची शक्यता होती. ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात याविषयावर प्रकाशझोत टाकला. त्याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने त्वरित कार्यवाही केली.होलसेल भाजी मार्केटमधील स्वच्छता- गृहांसह भाजी मंडई आवाराची साफसफाई करण्यात आली.खेड्यातून भाजी विकायला येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मंडईतील बाजारकट्यांसमोरील रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या आॅईल पेंटने मार्किंग करून बैठकीची व्यवस्था करण्यात आली.