शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मंडई बंद म्हणजे बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:24 IST

कोल्हापूर : वाढत्या गर्दीमुळे भाजी मंडई कोरोना हॉटस्पॉट ठरण्याच्या भीतीने महापालिका प्रशासकांनी भाजी मंडई बॅरिकेटस् लावून बंद करण्याचा निर्णय ...

कोल्हापूर : वाढत्या गर्दीमुळे भाजी मंडई कोरोना हॉटस्पॉट ठरण्याच्या भीतीने महापालिका प्रशासकांनी भाजी मंडई बॅरिकेटस् लावून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी त्याला विरोध झाला, तरी शनिवारी महापालिका अधिकच आक्रमक झाल्याने विक्रेत्यांनी मंडई बंदच ठेवली. त्यामुळे कायम गजबजलेली मंडईत शुकशुकाट होता; पण किरकाेळ माल विक्रीसाठी रस्त्यावर आल्याने सकाळी ११ पर्यंत रस्त्यावर गर्दी दिसत होती.

भाजी मंडईत कोणत्याहीप्रकारे सोशल डिस्टन्सचे पालन होत नसल्याने आणि कोरोनाग्रस्तांची संख्या रोजची दीड हजारापर्यंत जात असल्याने महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी शहरातील सर्व मंडई बंद ठेवण्याचे आदेश काढले होते, पण याला मंडईतील विक्रेत्यांकडून विरोध होता, तरीदेखील पोलीस प्रशासनाची मदत घेत बलकवडे यांनी मंडईना बॅरिकेटस् लावून बंद केले. शनिवारी सकाळी मंडई उघडलीच नाही, जेथे उघडली तेथे पोलिसांनी लगेच दंडुका उगारल्यानंतर लगेच सर्व माल झाकून ठेवत व्यापारी परतले.

मंडई बंद असल्याने बरेचसे विक्रेते रस्त्यावर येऊन विक्री करू लागले. ११ पर्यंत रस्त्यावर फिरून विक्री करण्याची मुभा असल्याने विक्रेत्यांनी गाडी, टेम्पो, सायकलवरून गल्लोगल्ली फिरुन भाजीपाला विक्रीचा पर्याय जवळ केल्याचे दिसत होते. मंडई बंद असली, तरी ग्राहकांची मात्र रस्त्यावर गर्दी दिसत होती.

ग्रामीण भागातून शहरात येऊन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही जास्त आहे. रस्त्याकडेला बसण्याची मुभा दिली असली तरी त्यालाही मर्यादा येत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

०८०५२०२१-कोल-भाजी मंडई

फोटो ओळ : कोल्हापुरात शनिवारी भाजी मंडई बंदच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी झाल्याने नेहमी ओसंडून वाहणाऱ्या कपिलतीर्थ मंडईत असा शुकशुकाट होता.

(छाया : आदित्य वेल्हाळ )