शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील भाजी मंडई बेमुदत बंद

By admin | Updated: March 2, 2017 00:22 IST

अडत विरोधात खरेदीदार आक्रमक : ज्याला अडत देणे शक्य त्यांनीच खरेदी करावी यावर प्रशासन ठाम

कोल्हापूर : अडत देण्यास विरोध कायम ठेवत शहरातील अकरा भाजी मंडई ‘बेमुदत बंद’ ठेवण्याचा निर्णय खरेदीदारांनी आज, बुधवारी घेतला. यामुळे बाजार समिती प्रशासनाने ज्याला अडत देण्यास परवडते त्यांनीच खरेदी करावी, अशी भूमिका घेत आज, गुरुवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘लायसन्स’ (खरेदी परवाना) असणाऱ्यांनाच यापुढे भाजीपाला खरेदीस परवानगी राहील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. भाजीपाल्यावर ६ टक्के अडत घेण्यास खरेदीदारांचा विरोध असून, त्यांनी बुधवारी सौदे बंद पाडून गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अडते, खरेदीदार व समिती प्रतिनिधींची बैठक झाली. किरकोळ भाजीपाला विक्रेते संघटनेचे राजू जाधव यांनी अडत देणार नसल्याचा पुनरुच्चार केला. येथे येणारा ९० टक्के माल हा परजिल्ह्यांतून येतो, शेतकऱ्यांचा अडतीला विरोध नसताना वसुली का करता? कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात बाजारात भाजीपाला येतो, त्यांच्या स्पर्धेत अडत देऊन टिकू शकत नसल्याचे राजेंद्र लायकर यांनी सांगितले. कायद्यानेच आम्ही अडत घेत असून, जर खरेदीदारांना द्यायची नसेल तर ती कोणाकडून घ्यायची, अशी विचारणा अडते जमीर बागवान यांनी केली. भगवान काटे म्हणाले, तुमची झुंडशाही खपवून घेणार नाही, समितीत शेतकऱ्यांना कोणी पुन्हा अडविण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसे उत्तर देऊ. यावर हरकत घेत विलास मेढे म्हणाले, येथे सर्व माल शेतकऱ्यांचा येत नाही. अडत्यांनी बाहेरून मागविलेल्या मालाला अडत का घेता? फळ मार्केटमध्ये कोणाकडून अडत घेता? सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यांनी दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी करण्यासाठी समितीत जागा उपलब्ध करून दिली आहे; पण आमच्या उघड व पारदर्शक सौदा प्रक्रियेमुळे शेतकरी आमच्याकडेच येतात. तुम्हाला जसे परवडते, तसा माल मागून घ्या, असे नंदकुमार वळंजू यांनी सांगितले. सौदे सुरू करण्याचे आवाहन सभापती सर्जेराव पाटील यांनी केले. खरेदीदारांची पुन्हा बैठक झाली. त्यामध्ये अडतीवर ते ठाम राहिल्याने चर्चा फिस्कटली. आज, गुरुवारपासून शहरातील अकरा भाजी मंडई बंद ठेवून सहाव्या दिवसांपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा राजू जाधव यांनी दिला. तुम्ही खरेदी करू नका; पण सौद्यात कोणी त्रास दिला तर खपवून घेणार नसल्याचा इशारा सभापती पाटील यांनी दिला. यावेळी शहर उपनिबंधक संभाजी निकम, सहायक निबंधक सुनील धायगुडे, विलास साठे, कृष्णात पाटील, उदय पाटील, बाबा लाड, मोहन सालपे यांनी चर्चेत भाग घेतला.भाजीपाला खरेदीदारांनी पाडले सौदे बंद आजपासून सौदे सुरू करण्याचा समितीचा निर्णय गाड्यांची हवा सोडली; ४० लाखांचा माल पडूनकोल्हापूर : बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदारांनी अडतीला विरोध करीत बुधवारी सौदे बंद पाडले. भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांतील हवा सोडून जोरदार गोंधळ केल्याने समितीतील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर खरेदीदारांनी नमती भूमिका घेतली; पण दिवसभर समितीत सुमारे ४० लाखांचा भाजीपाला पडून राहिला. भाजीपाल्यावर खरेदीदारांकडून आकारल्या जात असलेल्या सहा टक्के अडतीवरून हा गोंधळ सुरू आहे. बुधवारी पहाटे अचानक खरेदीदारांनी सौदे बंद केले. समितीमध्ये पहाटेपासून भाजीपाल्याची आवक-जावक सुरू असते. कोकणात पहाटेच माल पाठविला जातो. तो रोखून सकाळी सौदे काढू दिले नाहीत. बाहेरून भाजी खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांनाही या खरेदीदारांनी रोखले. भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांतील हवा सोडल्याने तणाव निर्माण झाला. समितीचे उपसचिव मोहन सालपे, भगवान काटे यांनी खरेदीदारांना समजावून समितीच्या आवाराबाहेर घालविले. तरीही काही खरेदीदारांनी गोंधळ करण्यास सुरू केल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण शांत झाले. दरम्यान, समितीत नेहमीप्रमाणे भाजीपाल्याची दोन हजार क्विंटल आवक झाली होती. त्याचा सौदा निघाला नाहीच; पण मालही समितीत दिवसभर पडून होता. अचानक खरेदीदारांनी सौदे बंद केल्याने सुमारे ४० लाखांचा माल पडून राहिला.भाजीपाल्याची नुकसानभरपाई खरेदीदारांनी अचानक सौदे बंद पाडल्याने भाजीपाला पडून राहिला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई बाजार समितीने द्यावी, अशी मागणी जमीर बागवान व नंदकुमार वळंजू यांनी केली.परवडत असेल तर घ्या...ज्यांना अडत देणे परवडते त्यांनीच माल खरेदी करावा. तुमच्याशिवाय माल खपणार नाही, असे कोणी समजू नये, अशा शब्दांत नंदकुमार वळंजू यांनी खरेदीदारांना सुनावले. जाधव-लायकर खडाजंगीभाजी मंडई बंद ठेवण्यावर एकमत झाले; पण मंडईत शेतकरी विक्री करण्यास आले तर त्यांना परवानगी देण्यावरून संघटनेचे राजू जाधव व राजेंद्र लायकर यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. तर मंडईत येणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणी गुरगुरले तर त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा भगवान काटे यांनी दिला.