शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजीचा फणस बाजारात; भाज्या कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 10:54 IST

कोल्हापूर शहरातील बाजारात भाजीचा फणस दाखल झाल्याने तो घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे; तर या आठवड्यात बहुतांश भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा दरांवर परिणाम झाला आहे. वांगी, गवार, कारली, दोडका, आदी भाज्यांचे दर कडाडले आहेत. दुसरीकडे, हुताशनी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हरभराडाळ, पोळीच्या आट्याला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. हरभराडाळ ६८ रुपये, तर पोळीचा आटा ३२ रुपये प्रतिकिलो असा दर होता.

ठळक मुद्देभाजीचा फणस बाजारात; भाज्या कडाडल्याहुताशनी पौेर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हरभराडाळ, पोळीच्या आट्याला मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील बाजारात भाजीचा फणस दाखल झाल्याने तो घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे; तर या आठवड्यात बहुतांश भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा दरांवर परिणाम झाला आहे. वांगी, गवार, कारली, दोडका, आदी भाज्यांचे दर कडाडले आहेत. दुसरीकडे, हुताशनी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हरभराडाळ, पोळीच्या आट्याला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. हरभराडाळ ६८ रुपये, तर पोळीचा आटा ३२ रुपये प्रतिकिलो असा दर होता.गेल्या आठवड्यात बाजारात भाज्यांची आवक जास्त होती; त्यामुळे भाज्यांचे दर कमी होते; पण या आठवड्यात वांगी, ढबू मिरची, ओला वाटाणा, कारली, दोडका, मेथीच्या दरात वाढ झाली. घाऊक बाजारात वांगी ३० रुपये, ढबू मिरची ३५ रुपये तर किरकोळ बाजारात गवार १२० रुपये, ओला वाटाणा ३० रुपये, कारली ४० रुपये, दोडका ४२ रुपये किलो होता. मात्र कोबी, ओली मिरची, घेवडा, भेंडी, वरणा, फ्लॉवरचे दर स्थिर होते.

पोकळ्याचा दर कमी झाला होता. तो पाच रुपये झाला होता. यंदा भाजीचा फणस हा २० रुपयांपासून ६० रुपयांच्या घरात होता; तर मोठा कापा फणस सुमारे १२० रुपये असा दर होता. याचबरोबर कांदा, लसूण व बटाट्याच्या दरात वाढ झाली आहे.

घाऊक बाजारात १० किलो कांद्याचा दर ५० रुपये, बटाटा १२० रुपये; तर लसूण २५० रुपये होते. फळबाजारामध्ये द्राक्षे, अननसांची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात द्राक्षे ३५ रुपयांनी होती. अननस ४० रुपये होते. तसेच आंबा हापूस पेटी दीड हजार रुपये, बॉक्स ४०० रुपये होता.तसेच तांदूळ, गव्हाचे दर स्थिर आहेत; पण तूरडाळीच्या दरात चार रुपयांनी प्रतिकिलो वाढ होऊन ती ८८ रुपये झाली. सूर्यफुलाचे तेल ९५ वरून १०५ रुपये असे झाले आहे. दरवर्षीप्रमाणे मार्चच्या महिन्यात चटणीच्या मसाल्याला ग्राहकांकडून मागणी वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोथिंबिरीची पेंढी कमी दरानेघाऊक बाजारात कोथिंबिरीच्या पेंढीचा दर २५० रुपये शेकडा आहे; त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबिरीची पेंढी साधारणत: तीन ते पाच रुपये होती. ती घेण्यासाठी बाजारात गर्दी होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारभोगाव, करंजफेण परिसरातून भाजीचा फणस येतो. यंदा फणसाला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.-अनुसया मरगळ, फणस विके्रत्या, कोल्हापूर. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर