शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

व्यापार-उद्योगात पुढारलेला वीरशैव लिंगायत समाज

By admin | Updated: April 13, 2015 00:02 IST

शहर विकासात अग्रेसर : राजर्षी शाहू महाराज यांच्या निमत्रंणावरून आणि व्यापाराच्या निमित्ताने कोल्हापुरात दाखल--लोकमतसंगे जाणून घेऊ

इंदुमती गणेश - कोल्हापूर -लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा राजाश्रय लाभलेल्या विविध धर्मांपैकी वीरशैव लिंगायत हा एक समाज. शाहू महाराजांच्या निमंत्रणावरून आणि व्यापाराच्या निमित्ताने कोल्हापुरात स्थायिक झालेल्या या समाजाने प्रगतीचे अनेक टप्पे पार करीत या शहराच्या धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वीरशैव लिंगायत हा एक प्राचीन धर्म आहे. महात्मा बसवेश्वर हे वीरशैव समाजातील एक महत्त्वाची विभूती आहेत. बसवेश्वर हे शंकराच्या नंदीचा अवतार आहेत, असा पुराणात उल्लेख आहे. या धर्माची पाच प्रमुख पीठे आहेत. या धर्मातही लिंगायत कोष्टी, माळी, तेली, कुंभार, दिधावंत, चिलवंत अशा पोटजाती आहेत. म्हणजे ‘किराणा व अडत व्यापार करणारा समाज म्हणजेच वाणी’ अशी या समाजाची ओळख.समाजातील विरूपाक्ष नष्टे, स्वामी कद्रे आणि कंपनी, बाळाप्पा चौगुले, राजाराम गाडवे, विरूपाक्ष टकले, काशाप्पाण्णा करंबळी हे व्यापारानिमित्त कोल्हापुरात आले. उदरनिर्वाहासाठी आलेल्या या वीरशैव समाजातील व्यक्तींनी लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, मार्केट यार्ड, मंडई याठिकाणी जागा घेऊन किराणा व अडत व्यापाराला सुरुवात केली. वैशिष्ट्य म्हणजे आजही या समाजातील ८० टक्के लोक याच व्यवसायात आहेत. यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स, कापड, मिठाई, हॉटेल, अवजड उद्योग असणारे कारखाने, विविध कंपन्या स्थापन करून त्यांनी आपली प्रगती केली आहे. महादेव अण्णा तोडकर यांनी १९६७ साली कोल्हापूर वीरशैव समाजाची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून सर्व वीरशैव लिंगायत समाज एकत्र आला. समाजातर्फे दरवर्षी बसवेश्वर जयंती, शिवजयंती, अक्कमहादेवी जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने व्याख्याने, मिरवणूक, महाप्रसाद व मान्यवरांचा सत्कार केला जातो. विविध गणाधीशांची प्रवचने, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रम, वधू-वर मेळावा, रोजगार निर्मितीची माहिती देणे, स्नेहसंमेलन असे कार्यक्रम घेतले जातात. वीरशैव, अक्कमहादेवी महिला मंडळातर्फे प्रत्येक बुधवारी ‘भजन-तरंग’ हा कार्यक्रम घेतला जातो. यात शंभरहून अधिक महिला सहभागी होतात. महिलांसाठी विविध पाककला स्पर्धा, नृत्य, वेशभूषा स्पर्धा, नवरात्रौत्सवात रास-दांडिया, हळदी-कुंकू, सहली असे उपक्रम राबविले जातात. तसेच विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजविलेल्या महिलांना अक्कमहादेवी पुरस्कारही दिला जातो.समाजाच्या विकासासाठी बिंदू चौक परिसरात १९६४ साली चंद्रकांत करंबळी यांनी अक्कमहादेवी मंटप व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधले. रावसाहेब माळी यांनी वीरशैव बँकेची स्थापना १९४२ ला केली. या बँकेचे १८ हजार सभासद आहेत. बँकेच्या २६ शाखा असून ५०० कोटींच्या वर ठेवी आहेत. गरजू समाजबांधवांना बँकेचा मोठा आधार आहे.शून्य सिंहासन परंपरेतील कर्नाटकातील बृहन्मठ श्री चित्रदुर्गचे जगद्गुरू श्री जयदेव महास्वामीजी अथणी येथे आले असता त्यांची राजर्षी शाहू महाराजांशी भेट झाली. शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापुरात येण्याचे निमंत्रण दिले. स्वामीजींचे कोल्हापुरात ‘अड्डपालखी’ उत्सवाने भव्य स्वागत करण्यात आले. राजर्षींनी जगद्गुरूंना वीरशैव समाजातील मुलांनी शिकावे, त्यांच्या राहण्याची सोय व्हावी, हा समाज विकसित व्हावा यासाठी १९०६ ला दसरा चौकातील चित्रदुर्ग मठाची जागा दिली. येथील वसतिगृहात कै. रत्नाप्पाण्णा कुंभार, भारताचे उपराष्ट्रपती कै. बी. डी. जप्ती, अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी वास्तव्य करून शिक्षण घेतले आहे.कोल्हापुरात महात्मा बसवेश्वरांचा एकही पुतळा नाही. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठासमोरील चौकात बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा उभारून या चौकाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी समाजाची मागणी आहे. तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या काळात त्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले गेले होते. मात्र, अद्याप हा विषय प्रलंबित आहे.