शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादांचा जन्मशताब्दी कार्यक्रम निश्चित

By admin | Updated: October 23, 2016 00:36 IST

मुंबईत बैठक : १३ नोव्हेंबरला मुख्य कार्यक्रम; तुरुंगातील आठवणींनाही मिळणार उजाळा

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सवास सांगलीतून १३ नोव्हेंबरला सुरुवात करण्याचा निर्णय शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दादांना तुरुंगात जेथे ठेवले होते व तुरुंग फोडून जेथून त्यांनी क्रांतीची उडी घेतली, त्या जागांना भेट देऊन महोत्सव समितीचे पदाधिकारी व कॉँग्रेसचे नेते दादांच्या स्मृतीस अभिवादन करणार आहेत. महोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत टिळक भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, आ. मधुकरराव चव्हाण, हर्षवर्धन पाटील, खा. हुसेन दलवाई, भाई जगताप यांच्यासह सुमारे ३० पदाधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते. सांगलीतून वसंतदादांचे नातू विशाल पाटील, वसंतदादांचे सहकारी यशवंत हाप्पे आणि कॉँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटीलही या बैठकीला उपस्थित होते. सांगलीत १३ नोव्हेंबरला दादांच्या जयंतीदिनी सकाळी दादांना सांगलीच्या कारागृहात जेथे ठेवले होते, त्या जागेला तसेच जेथून तुरुंग फोडून दादांनी उडी मारली, त्या जागेस महोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य भेट देणार आहेत. तेथे अभिवादन केल्यानंतर सकाळी दहा वाजता कृष्णाकाठी उभारण्यात आलेल्या समाधीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर जन्मशताब्दी प्रारंभ सोहळा सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी गृहमंत्री शिवराज पाटील, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे, डॉ. डी. वाय. पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सोहळ््यानंतर राज्यात वर्षभर महोत्सव समितीमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रदेश कॉँग्रेस कमिटीने ही समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील, समन्वय म्हणून हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम आदी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबईलाही कार्यक्रम वर्षभरात पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई येथे मोठे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये सहकार परिषद, शैक्षणिक चर्चासत्र, दादांच्या जीवनावरील व्याख्याने यासह अन्य कार्यक्रमांचा समावेश आहे.