शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

वारणा योजना दानोळीतूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:51 IST

कोल्हापूर : राज्य शासनाच्या अमृत योजनेतून इचलकरंजी शहरासाठी पाणीपुरवठ्याकरीता मंजूर झालेली वारणा पाणी योजना दानोळी (ता. शिरोळ) येथूनच होणार ...

कोल्हापूर : राज्य शासनाच्या अमृत योजनेतून इचलकरंजी शहरासाठी पाणीपुरवठ्याकरीता मंजूर झालेली वारणा पाणी योजना दानोळी (ता. शिरोळ) येथूनच होणार आहे. याबाबत दोन दिवसांत ई-निविदा प्रसिद्ध करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाला दिले.शासकीय विश्रामगृह येथे वारणा पाणी योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख उपस्थिती आमदार सुरेश हाळवणकर, इचलकरंजी नगराध्यक्षा अलका स्वामी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी आमदार अशोक जांभळे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य समिती सभापती संगीता आलासे, मुख्याधिकारी दीपक पाटील आदींची होती.इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ७० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. सुरुवातीला दानोळीतून या योजनेला मंजुरी मिळाली आहे; परंतु या ठिकाणी विरोध होऊ लागल्याने कोथळी येथे पर्याय निवडून सर्व्हेच्या कामाला सुरुवात झाली; परंतु त्या ठिकाणीही विरोध होऊ लागला. आठ महिने झाले तरी कोणताही निर्णय होत नाही. प्रत्येक जण आपापले घोडे दामटत आहे.शहराची वस्ती चार लाखांवर गेली आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. शहरात आठवड्याने पाणी येत आहे. त्यामुळे ही योजना लवकर झाल्याशिवाय पर्याय नाही; अन्यथा नागरिक आम्हाला बसू देणार नाहीत, अशा भावना पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.यावर पालकमंत्र्यांनी पूर्वी मंजूर असलेल्या दानोळीतूनच ही योजना सुरू करावी, तसेच याची दोन दिवसांत ई-निविदा प्रसिद्ध करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाला दिले. त्यानुसार दोन दिवसांत ई-निविदा प्रसिद्ध करुन पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.यावेळी ताराराणी आघाडी पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे, नगरसेविका गीता भोसले, नगरसेवक युवराज माळी, अजित जाधव, रवींद्र माने आदी उपस्थित होते.योजना कदापि होऊ देणार नाही : धनवडेइचलकरंजीच्या राजकारण्यांना जनतेला शुद्ध पाणी द्यायचे नाही, फक्त शुद्ध पाण्याच्या नावावर राजकारण करायचे आहे. यापूर्वी मंत्रालयामध्ये पालकमंत्र्यांसोबतच ही योजना दानोळीतून रद्द करण्यात आली होती. आणि यासाठी पुन्हा दानोळीचे नाव पालकमंत्री घेत आहेत. हा निवडणुकीचा फंडा असून बाकी काही नाही. निवडणुका तोंडावर आल्याने योजनेच्या नावावर आपली पोळी भाजण्याचा प्रकार आहे. या योजनेचा निधी गेला आहे, कसलीही प्रशासकीय मंजुरी नाही, यापुढे या योजनेसाठी दानोळीचे नाव घेऊ नये, असा इशारा वारणा बचाव कृती समितीचे महादेव धनवडे यांनी दिला.महादेव धनवडेअध्यक्ष, वारणा बचाव कृती समिती दानोळी