शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वारणा दूध संघाची निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: December 6, 2015 01:38 IST

सलग आठव्यांदा बिनविरोध : आठ नवीन चेहऱ्यांना संधी, विद्यमान अकरा संचालकांना डच्चू

वारणानगर : येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २१ जणांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने वारणा समूहाचे नेते व माजी मंत्री विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली वारणा दूध संघाची ही निवडणूक सलग आठव्यांदा बिनविरोध झाली. संघाच्या या संचालक मंडळात आठ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, संचालक मंडळातील विद्यमान अकरा संचालकांना वगळण्यात आले आहे. तात्यासाहेब कोरेनगर (ता. पन्हाळा) येथील श्री वारणा दूध उत्पादक संघाची सन २०१५-२०२० या सालासाठीची ही पंचवार्षिक निवडणूक मल्टिस्टेट को-आॅप. अ‍ॅक्ट २००२ अन्वये नियमाप्रमाणे घेण्यात आली. ‘वारणा दूध संघ’ हा बहुराज्यीय संघ आहे. संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माघारीसाठी शनिवारचा शेवटचा दिवस होता. माघारीनंतर बिनविरोध निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर बिनविरोध निवडणुकीची अधिकृत घोषणा मल्टिस्टेट अ‍ॅक्टप्रमाणे सोमवारी (दि. ७ डिसेंबर) दुपारी एक वाजता संघ कार्यस्थळावर बोलविलेल्या सभेत होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड़ अभिजित परमणे यांनी दिली. वारणा दूध संघाच्या या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी एकूण ५७ अर्ज दाखल झाले होते. छाननीच्या प्रक्रियेत पाच अर्ज अवैध ठरले, तर ५२ अर्ज वैध ठरले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ३१ जणांनी माघार घेतल्याने २१ जागांसाठी २१ जणांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. बिनविरोध संचालक असे : उत्पादक सभासद ‘अ’ वर्ग - (१३ जागा), विनय विलासराव कोरे (वारणानगर), अरुण बाबासाहेब पाटील (कुंभोज), हिंदुराव रंगराव जाधव (बहिरेवाडी), शिवाजी रामचंद्र कापरे (कोडोली), आनंदराव धोंडिराम घाटगे (आरळे), अभिजित शिवाजीराव पाटील (चिकुर्डे), दीपकराव आनंदराव पाटील (खोची), बाळासो दादू पाटील (वाठार तर्फ उदगांव), राजाराम महादेव देशमुख-चौगुले (नवे पारगांव), नेमगोंडा रायगोंडा पाटील (किणी), महेंद्र बजरंग शिंदे (वाठार तर्फ वडगाव), मोहन ज्ञानू मगदूम (कोरेगांव), लालासोा आनंदराव पाटील (तांदूळवाडी). संस्था सभासद प्रतिनिधी ब-वर्ग (२ जागा), जालिंदर रावसो पाटील (वशी), राजवर्धन हंबीरराव मोहिते (घुणकी). ग्राहक सभासद प्रतिनिधी - क वर्ग (२ जागा), भाऊसाहेब राजाराम गुळवणी (तळसंदे), शिवाजी आकाराम मोरे (मोहरे). अनु. जाती/ जमाती प्रतिनिधी, आनंदराव हणमंत कुरणे (कोडोली), शिवाजी महादेव जंगम (जाखले). महिला प्रतिनिधी (२ जागा), शोभा प्रकाश पाटील (कांदे), शोभा अनिल साखरपे (कोडोली). (वार्ताहर)