शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वारणा बझार फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:43 IST

पेठवडगाव : येथील वारणा बझारच्या डिपार्टमेंट स्टोअर्समधील लॉकरच्या दरवाजाचा पत्रा ग्रार्इंडरने कापून चोरट्यांनी सोमवारी पहाटे १८ लाखांची रोकड लंपास ...

पेठवडगाव : येथील वारणा बझारच्या डिपार्टमेंट स्टोअर्समधील लॉकरच्या दरवाजाचा पत्रा ग्रार्इंडरने कापून चोरट्यांनी सोमवारी पहाटे १८ लाखांची रोकड लंपास केली. चार सुरक्षारक्षक असतानाही चोरट्यांनी आत प्रवेश कसा केला, ते बाहेर कसे गेले याबाबत गूढ असून, या चोरीमुळे पोलीस यंत्रणा चक्रावली आहे.याबाबतची फिर्याद रावसो मलकान्ना घेवारी (रा. अंबप) यांनी दिली आहे. रात्री कामावर असणाऱ्या चार सुरक्षारक्षकांकडे पोलीस रात्री उशिरापर्यंत चौकशी करत होते. मात्र, ठोस धागेदोरे मिळाले नाहीत. तपासासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली आहेत.घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव-लाटवडे रस्त्यावर वारणा बझारचे अद्यावत डिपार्टमेंट स्टोअर्स आहे. या शाखेसह परिसरातील अन्य शाखांमध्ये दीपावलीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी असल्यामुळे मोठी रक्कम जमा झाली होती. शनिवार व रविवारी बँकांना सुट्टी असल्यामुळे इस्लामपूर, किणी, खोची, दानोळी, आदी बारा शाखांची २० लाख १८ हजार १६६ रुपये इतकी रक्कम पेठवडगाव शाखेत ठेवण्यात आली होती. या शाखेतील तळमजल्यावर एक व पहिल्या मजल्यावर एक लॉकर आहे. यातील तळमजल्यावरील लॉकरमध्ये २० लाख, तर पहिल्या मजल्यावरील लॉकरमध्ये सुमारे २० लाख रुपये ठेवले होते. ही रक्कम पेठवडगाव शाखेसह अन्य शाखेतील होती. रविवारी रात्री हा बझार रात्री आठच्या सुमारास ग्राहकांना बंद करण्यात आला. त्यानंतर नऊ वाजता कर्मचाºयांनी कुलपे घातली. यातील एक किल्ली कॅशियर व एक किल्ली मॅनेजरकडे असते. चोरी झाली त्या रात्री बाबासो नांगरे, राजेंद्र पाटील, धनंजय कुंभार, आदी सुरक्षारक्षक कामावर होते.सोमवारी पहाटे चोरट्यांनी लॉकरच्या दाराचा सुमारे एक सेंटीमीटर जाड असणारा पत्रा ग्राइंडरने कापून फट तयार केली. या फटीतून सुमारे १८ लाख १३ हजार ४६६ रुपये लंपास केले. यातील दोन लाख चार हजार सातशे रुपये त्यांना काढता आले नाहीत. दरम्यान, चोरटे तळमजल्याकडे न गेल्याने तेथे ठेवलेली २० लाखांची रक्कम सुरक्षित राहिली.घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक आसमा मुल्ला, विकास माने, बालाजी घोळवे, दादा माने, संदीप गायकवाड, रणवीर जाधव, नंदकुमार घुगरे, विशाल हुबाले, आदींनी धाव घेतली. घटनास्थळी ठसेतज्ञ्ज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. बी. पुणेकर यांना लॉकरवर एक ठसा मिळाला आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी भेट देऊन तपासासाठी सूचना केल्या. तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आदींच्या पथकांनी तपासण्यासाठी मदत केली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे करीत आहेत.