शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारपासून विविध कार्यक्रम

By admin | Updated: April 8, 2017 17:45 IST

महोत्सव समितीतर्फे आयोजन, शोभायात्रेने प्रारंभ

आॅनलाईन लोकमत कोल्हापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त मंगळवार (दि.११)पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भिम महोत्सवांतर्गत विविध मान्यवरांच्या व्याख्यानांबरोबरच शहरातून भव्य शोभायात्राही काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सखाराम कामत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.कामत म्हणाले, महामानवांच्या एकत्र येऊन जयंती साजरी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक ऐक्य व सलोखा प्रस्थापित करणे तसेच राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी जयंती समिती सातत्याने प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले, बिंदू चौक येथे मंगळवारी (दि.११) भिम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन महापौर हसिना फरास यांच्या होणार आहे. त्याचबरोब मंगळवार ते गुरुवार (दि.१३) या कालावधित विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. शुक्रवारी (दि.१४) मुख्य जयंती सोहळ्यात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन शाहू छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधिक्षक महादेव तांबडे, समाज कल्याण आयुक्त विजयकुमार गायकवाड आदी मान्यवरांची राहणार आहे.२३ एप्रिलला दुपारी ३ वाजता दसरा चौक येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक प्रा. जोगेंद्र कवाडे व प्रज्ञा दया पवार यांची राहणर आहे. यानंतर प्रा. कवाडे व प्रज्ञा पवार यांचे मार्गदर्शन होणार आहे.यावेळी सचिव टी. एस. कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, अ‍ॅड.पंडितराव सडोलीकर, अनंत मांडुकलीकर, सुभाष देसाई आदी उपस्थित होते.