लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीच्यावतीने उद्या,शुक्रवारी रंकाळा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या रंकाळ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून २५ डिसेंबर हा दिवस रंकाळा दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वच्छ, सुंदर रंकाळा तलावासाठी व कोल्हापूरकरांना आरोग्यदायी जीवन देणाऱ्या रंकाळ्याचे संवर्धन, संरक्षण जनजागृतीसाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजता स्वच्छता मोहीम व रंकाळा संवर्धन प्रतिज्ञा व सायंकाळी ४.३० वाजता रंकाळा पदपथ उद्यानात राजेंद्र पाटील लिखित रंकाळ-रंकतीर्थ, शौर्यतीर् , पक्षीतीर्थ या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डाॅ. वसंतराव मोरे यांच्या उपस्थित होणार आहे. यानंतर स्वरनिनाद प्रस्तुत शब्द सुरांच्या झुल्यावर ही सदाबहार गीतांची मैफल आयोजित केली आहे.