शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पेठवडगाव परिसरात विविध ४१ जातींचे पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:56 IST

पेठवडगाव : महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई संस्थेच्या आवाहनानुसार येथील महालक्ष्मी तलावावर पक्षीगणना करण्यात आली. ...

पेठवडगाव : महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई संस्थेच्या आवाहनानुसार येथील महालक्ष्मी तलावावर पक्षीगणना करण्यात आली. यामध्ये ४१ जातींचे २१४ पक्षी आढळले.चावरे (ता. हातकणंगले) येथील विवेकानंद फौंडेशन, पीपल्स फॉर अ‍ॅनिमल यांच्या सहकार्याने ही पक्षीगणना करण्यात आली. महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे कोल्हापूर जिल्ह्याचे निमंत्रित सदस्य युवराज पाटील, पेटा संघटनेचे सदस्य व वन्यजीव छायाचित्रकार संदीप पाटील, सुरेश चिबडे, डॉ. अमोल पाटील, नीलेश घारसे यांनी नियोजन केले. या गणनेत डॉ. अजित चव्हाण, नगरसेवक गुरुप्रसाद यादव, उदय ढवळे, संतोष लडगे, धनाजी वाघ, प्रकाश भाकरे, अनंत ढवळे, आदींसह ५० हून अधिक पक्षीप्रेमींनी सहभाग नोंदविला.राज्यभर पक्षीसप्ताहपक्षीतज्ज्ञ डॉ. सलिम अली यांची जयंती व माजी वन अधिकारी मारुती चितमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त ५ व १२ नोव्हेंबर या सप्ताहात राज्यभर पक्षीसप्ताह साजरा केला जातो.पक्षी व त्यांची संख्या - वेडा राघू - ११, सामान्य सातभाई - १०, स्टोन च्याट - १, वटवट्या - २, बुलबुल - १९, लाफिंग डव - ५, कावळा- २३, भारद्वाज - २, इंडियन रॉबिन-५, माळ तिटवी - १, ग्रे फ्रँकलिन - २, कोतवाल - ४, छोटा बगळा - २, पॉण्ड हेरॉन - १, लिटल कार्मोरंट - ४, मोर - ३, ग्रे हेरॉन - ९, ब्राह्मणी काईट -३, व्हाइट व्यागटेल - १, लिटल स्टिंट - २, सॅण्ड पाइपर - २, खंड्या - १, कापशी घार - १, जांभळा शिंजीर - १२, भारतीय पोपट - ४, प्लम हेडेड पँराकीट - ४, पॉण्ड हेरॉन - २, इंडियन मैना - ६, हळदी कुंकू बदक - ६, कोकिळा - २, चंडोल - १४, पारवा - ३, स्वालो - २९, स्टोन चॅट - १, स्पूनबिल - ३, कॉपर स्मिथ बारबेट - १, मध्यम बगळा - १, लिटिल रिंगड प्लवर - ५, ग्रे हार्नबिल - २, स्केली ब्रिस्टेड मुनिया - ५, पर्पल हेरॉन - १, पांढरा धोबी -१, रिव्हर्टर्न - २, ग्रे श्राइक - १. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १० प्रकारचे जास्त पक्षी नोंद केले. एकूण ४१ पक्ष्यांचे प्रकार पाहायला मिळाले. यामध्ये सर्वांत जास्त कावळे २३, स्वालो (भिंगरी) २९, बुलबुल १९, वेडा राघू ११, तर सामान्य सातभाई १० च्मागील वर्षी ३१ प्रकारच्या ११८ पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती, तर यावर्षी ९६ हून अधिक पक्षी आढळले. एकूणच यावर्षी पक्षी प्रकार व त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली.