कोल्हापूर : पर्यूषण पर्व समाप्ती निमित्त रविवारी कोल्हापुरातील गुजरी इथल्या श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने मोजकेच श्रावक, श्राविका आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भेंडी गल्ली, भाऊसिंगजी रोड, गुजरी परिसरातून कोरोना नियमावलीचे पालन करत (वरघोडा) मिरवणूक काढण्यात आली.
जैन धर्मीयांची ११ वार्षिक कर्तव्य आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पर्यूषण पर्व समाप्तीनिमित्त भगवान श्री महावीर यांच्या वरघोडा (मिरवणूक) काढणे होय. सध्या कोरोना संसर्गाचा काळ असल्यामुळे गर्दी टाळत रविवारी जैन समाजातील मोजक्याच श्रावक, श्राविका, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, उपाध्यक्ष राजेश निंबजीया, उत्तम गांधी, दिलीप जिवाजी, उत्तम मांगीलाल, राजू पन्नालाल, राजेश राठोड, राजेंद्र अंबालाल, नीलेश ओसवाल, माजी नगरसेवक ईश्वर परमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १२०९२०२१-कोल-जैन समाज
ओळ - कोल्हापुरातील गुजरी येथील श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने रविवारी मोजकेच श्रावक, श्राविका आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वरघोडा (मिरवणूक) काढण्यात आली.