शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उचगावमध्ये पिलाला दगड मारल्याने वानरसेनेचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:30 IST

उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील सरस्वती कॉलनी परिसरात रविवार दुपारी खेळत असणाऱ्या मुलांनी वानराच्या पिल्लास दगड मारल्याने संतप्त वानरांनी रुद्रअवतार धारण करीत अनेक घरांची काचेची तावदाने फोडली. यावेळी त्यांनी दारात लावलेल्या कारचीही काच फोडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. रविवारी दुपारी ही घटना घडली.सरस्वती कॉलनीत एका झाडावर वानरी व तिची ...

उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथील सरस्वती कॉलनी परिसरात रविवार दुपारी खेळत असणाऱ्या मुलांनी वानराच्या पिल्लास दगड मारल्याने संतप्त वानरांनी रुद्रअवतार धारण करीत अनेक घरांची काचेची तावदाने फोडली. यावेळी त्यांनी दारात लावलेल्या कारचीही काच फोडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. रविवारी दुपारी ही घटना घडली.सरस्वती कॉलनीत एका झाडावर वानरी व तिची पिल्ले गेल्या काही दिवसापासून वास्तव्यास आहेत. येथील खेळणाºया मुलांनी गंमत म्हणून दगड फेकून मारले. वानरी दगड चुकवित असताना एक दगड एका पिलाला लागला. त्यात हे पिल्लू जखमी झाल्याचे पाहून वानरी व तिची अन्य पिल्ली तसेच या परिसरातील इतर वानरेही सैरभैर झाली. त्यांच्या हाताला जे जे लागेल ते ते ती भिरकावत सुटली. परिसरातील नागरिकांवरही धावून जाऊ लागली. खेळणारी मुले तेथून पळून गेली. दोन तास हा थरार या परिसरात सुरू होता. ग्रामस्थांनी आपल्या घरांची दारे-खिडक्या बंद केल्याचे पाहून वानरांनी त्यांच्या दारांवर, घरांवर, खिडक्यांवर हल्ला चढवला. त्यात अनेक घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. एका घराच्या दारात लावलेल्या कारलाही वानरांनी लक्ष्य केले. कारवर मोठी फांदी फेकल्याने कारची मागील काच फुटली आहे. वानरसेनेचा एवढा रुद्रावतार पहिल्यांदाच ग्रामस्थांनी अनुभवला. हा थरार एखाद्या चित्रपटातील दृश्यात शोभेल असाच होता. काही ग्रामस्थांनी व मुलांनी वानरांचा रुद्रावतार बघून तेथून पळ काढला; पण केवळ दोन तासांत घडलेल्या या प्रकाराने वातावरण गंभीर झाले होते.पिल्लू जखमी झाल्यानेपिल्लू जखमी झाल्याने वानरी संतप्त झाली होती. ती दोन तास इकडे तिकडे धुमाकूळ घालत फिरत होती. बाकीची वानरे तिला सोडून गेली तरी ती जागची हलली नव्हती. ग्रामस्थ किंवा खेळणारी मुले दिसली की ती जास्तच आकांडतांडव करीत होती.