शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वंदना मगदूम यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:54 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतिपदी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी विकास आघाडीच्या वंदना चंद्रकांत मगदूम (माणगाव) यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शुभांगी शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडीसाठी सोमवारी दुपारी ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतिपदी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी विकास आघाडीच्या वंदना चंद्रकांत मगदूम (माणगाव) यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शुभांगी शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडीसाठी सोमवारी दुपारी तीन वाजता जिल्हा परिषद सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ ते दुपारी १ या अर्ज दाखल करण्याच्या वेळेत वंदना मगदूम यांचा एकमेव अर्ज आल्याचे सांगून त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे इथापे यांनी जाहीर केले. यावेळी मगदूम यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून, फटाके फोडून आनंद व्यक्त केला.सव्वावर्षांनंतर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी बदलण्याचे ठरल्याचे सांगत मगदूम यांच्याकडून याबाबत नेतेमंडळींच्या दोन महिन्यांपासून भेटीगाठी सुरू होत्या. ‘स्वाभिमानी’च्या शुभांगी शिंदे सहजासहजी राजीनाम्यासाठी तयार नव्हत्या; मात्र एकीकडे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना प्र्रकाश आवाडे गटाला नाराज करणे शक्य नसल्याने खासदार राजू शेट्टी यांनी सूचना केली आणि त्यानंतर शिंदे यांनी राजीनामा दिला.आवाडे गटाचा उमेदवार असल्याने आमदार सतेज पाटील यांनीही यामध्ये फार लक्ष घातले नाही. त्यामुळे मगदूम यांची निवड ही एक औपचारिकताच राहिली होती. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्तारूढ सदस्यांची बैठक घेऊन त्यामध्ये मगदूम यांचे नाव जाहीर केले होते. त्यानुसार बिनविरोध ही निवड पार पडली. अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या हस्ते यावेळी मगदूम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, विशांत महापुरे, अंबरीश घाटगे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, संजय अवघडे उपस्थित होते.अभिनंदनाच्या निमित्ताने सत्तारुढ, विरोधकांची टोलेबाजीमगदूम यांचे अभिनंदन करताना सत्तारूढ- विरोधकांनी एकमेकांना टोले लगावण्याची संधी सोडली नाही. राष्ट्रवादीचे सदस्य सतीश पाटील म्हणाले, आम्ही तुम्हाला सहकार्य केले आहे तसे आता निधीच्याबाबतीतही आम्हाला सामावून घ्या. भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे म्हणाले, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळीच बिनविरोध करूया असे आवाहन केले होते; मात्र आता ते अमलात आणले गेले. प्रवीण यादव म्हणाले, ज्या पद्धतीने शुभांगी शिंदे यांनी राजीनामा दिला त्यांचे अनुकरण अन्य पदाधिकाऱ्यांनी करावे. शिक्षण सभापती अंबरीश घाटगे म्हणाले, माणगावचे उपसरपंच राजू मगदूम यांनी निवड होईपर्यंत आम्हाला झोपू दिले नाही. यावेळी राहुल आवाडे, बंडा माने, विजया पाटील, शिवाजी मोरे, मनीषा माने यांची भाषणे झाली.आमचा नंबरलवकर येणार नाहीनिवडीनंतर शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ सदस्य, गटनेता अरुण इंगवले उभे राहिले. ते उभे राहिल्यानंतर अन्य सदस्यांनी आण्णा तुमचं काय असे विचारायला सुरुवात केली. तेव्हा ‘आमचा नंबर लगेच येणार नाही’ असे सांगत इंगवले यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.पुढच्या निवडणुकांनाही पाठिंबा राहू देअध्यक्ष शौमिका महाडिक यांनी ज्या पद्धतीने शुभांगी शिंदे यांनी कारभार केला त्याच पद्धतीने नूतन सभापतींनी काम करावे. हे पद जिल्ह्याचे आहे त्यामुळे आपल्याला जिल्हाभर काम करावे लागणार आहे, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. तर याही पुढच्या निवडणुकांना विरोधकांचा पाठिंबा राहू दे, अशी अपेक्षा व्यक्त केली.