शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वडगावचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर

By admin | Updated: February 19, 2016 00:22 IST

नगरपालिका सभेत एकमताने निर्णय : करवाढ नाही, एक कोटी नऊ लाखांतून विकासकामे

पेठवडगाव : वडगाव नगरपालिकेने करवाढ न करता एक कोटी नऊ लाख १८ हजार १२८ रुपये शिलकीचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर केले.२०१६-१७ या आर्थिक वर्षात भाजी मार्केट नव्याने विकसित करणे, सुधारित विकास आराखड्याचे नियोजन करणे, रस्त्यांचे डांबरीकरण, सुजल-निर्मल नगरोत्थानमधून शहरात सुधारित पाणीपुरवठा योजना, रमाई आवास घरकुल योजना, महालक्ष्मी तलावाचे संवर्धन ही कामे प्रस्तावित आहेत. पालिकेच्या स्व. विजयसिंह यादव सभागृहात गुरुवारी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा विद्या पोळ होत्या. विषयपत्रिकेचे वाचन सतीश पकाले यांनी, तर अर्थसंकल्पाचे वाचन उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केले. सदस्यांच्या प्रश्नांना मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी उत्तरे दिली. अर्थसंकल्पात २०१६-१७ मध्ये जमा बाजूमध्ये महसुली करापासूनचे उत्पन्न एक कोटी ३६ लाख २० हजार, अनुदाने चार कोटी ६३ लाख ७४ हजार, पालिकेच्या मालमत्तापासूनचे उत्पन्न २६ लाख ८० हजार, फी-भाडे-आकार उत्पन्न १७ लाख ४५ हजार, असे एकूण उत्पन्न सात कोटी २३ लाख २५ हजार रुपये दाखविण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनाअंतर्गत निधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नगरोत्थान अभियानातून तीन कोटी ५० लाख, रस्ता अनुदान, तीन कोटी सुजल-निर्मल योजना, दोन कोटी १५ लाख १४० व्या वित्त आयोगातून दोन कोटी, वैशिष्ट्यपूर्ण काम योजनेतून एक कोटी ७५ लाख, असा १५ कोटी ८८ लाखांचा अनुदानाचा निधी मिळण्याची शक्यता आहे. अशी असाधारण जमा एक कोटी ६९ लाख दोन हजार, तर आरंभीची तीन कोटी ३९ लाख ११ हजार २२८ रुपये आहे. त्यामुळे २८ कोटी १९ लाख ३८ हजार २२८ रुपये शिल्लक दाखविण्यात आलेले आहेत. पालिका हद्दीतील दिंगे कॉलनी, गांजवे बोळ, शाहू कॉलनी येथे आरसीसी गटर, नवीन वसाहतीमध्ये रायगड कॉलनी ते नायकवडी गल्ली, राऊत कॉलनीतील मुख्य रस्ता, आदी रस्त्यांचे खडी व डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच नव्याने भाजी मार्केट विकसित करण्यात येणार आहे. प्रश्नोत्तरांच्या तासात संतोष गाताडे यांनी वाहतूकप्रश्नी वडगाव पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला. याप्रश्नी वरिष्ठांकडे दाद मागावी, असे आवाहन केले. उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी सणगर, कुंभार गल्लीतील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला, तर रंगराव पाटील-बावडेकर यांनी बाजारांचे नियोजन योग्य प्रकारे झालेले नाही याकडे लक्ष वेधले, तर पालिकेचे कर्मचारी व्यापाऱ्यांबरोबर उद्धट वर्तन करतात, असा अभिजित पोळ यांनी आरोप केला. (प्रतिनिधी)नगरसेवकांचा प्रतिसाद : कचराकुंडीसाठी मदतकचरा संकलित करण्यासाठी दोन कचराकुंड्या देण्यासाठी लोकसहभागातून नगरसेवकांनी मदत करावी, असे आवाहन मुख्याधिकारी मुतकेकर यांनी केले. त्यास तत्काळ प्रतिसाद देत विश्रांत माने यांनी पाच हजार रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानंतर सर्वच नगरसेवकांनी पाच हजार देण्याचे मान्य केले.