शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

वडूज : उरमोडीचे पाणी सांगली जिल्ह्याला पळविणाऱ्यांचा निषेध

By admin | Updated: August 20, 2014 00:28 IST

पत्रकबाजी करण्याऐवजी कॅबिनेटमध्ये योजनेस विरोध करावा

वडूज : सांगलीच्या मंत्र्यांनी उरमोडी योजनेचे पाणी त्यांच्या जिल्ह्यातील गावांना घेऊन जाण्याचा डाव केला आहे. या योजनेचे भूमिपूजनही ढाणेवाडी गावात झाले. या प्रकाराबाबत जलसंपदामंंत्री शशिकांत शिंदे व माणचे आ. जयकुमार गोरे या दोघांनी कागदोपत्री पत्रकबाजी करण्याऐवजी कॅबिनेटमध्ये योजनेस विरोध करावा,’ अशी मागणी खटाव-माण तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली. ‘उरमोडी उपसा सिंंचन योजनेचे पाणी सांगलीला नेण्याचा निर्णय रद्द करा,’ या मागणीसाठी खटाव-माण तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सुरेंद्र गुदगे म्हणाले, ‘खटाव-माणची जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना दिशाभूलीचे राजकारण करत पाणी सांगलीकडे पळविले जात आहे. ही एकप्रकारे येथील जनतेची चेष्टा शासनकर्ते करीत आहेत. आम्ही मोर्चा काढला म्हणून आमच्यावर टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. सांगलीकरांचे गोडवे गाणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.’ दत्ता जगदाळे म्हणाले, ‘मोठे आंदोलने करून व मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही औंधसह सोळा गावांना द्यायला शासनाकडे पाणी नाही. परंतु, सांगली जिल्ह्याला द्यायला पाणी आले कोठून, अशा प्रकारे आमचा अंत बघणाऱ्यांना आगामी काळात धडा शिकविला जाईल.’ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते संजय भगत, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल भोसले, दिलीप तुपे, तानाजी देशमुख, राजाभाऊ देशमुख, मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांची भाषणे झाली. यावेळी प्रा. बंडा गोडसे, ‘रिपाई’चे किशोर सोनवणे, सतीश शेटे, शिवाजी पवार, सदाशिव खाडे, सोमनाथ माळी, प्रशांत गोडसे, सुरेश राऊत, हेमंत जाधव, रणजित घाडगे, दिगंबर शिंगाडे, संतोष जाधव ,अंजनकुमार घाडगे, सचिन मोरे, पंढरीनाथ तुपे, विकास जाधव, प्रशांत कणसे आदिंसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)