शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘वडाप’ खड्ड्यात कोसळली

By admin | Updated: August 30, 2016 23:49 IST

आठ जखमी : महाबळेश्वर येथे विद्यार्थी वाहतुकीवेळी अपघात

महाबळेश्वर : पाचगणीहून महाबळेश्वरला विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली वडाप जीप अवकाळी गावच्या हद्दीत रस्त्याकडेच्या वीस फूट खड्ड्यात जाऊन पलटी झाली. यात जीप चालकासह आठ विद्यार्थी जखमी झाले. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून तीन विद्यार्थ्यांना वाईच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर तालुक्यातील टेकवली येथील गणपत वागळे यांची वडाप जीप आहे. ते या जीपमधून महाबळेश्वरच्या विद्यार्थ्यांना पाचगणीला दररोज ने-आण करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पाचगणी येथून आठ विद्यार्थ्यांना घेऊन वडाप जीप महाबळेश्वरकडे येत होती. जीप अवकाळी हद्दीत आली असता महाबळेश्वरकडून वाईकडे जाणारी एसटी समोरून आली. एसटीला जागा देऊन पुढे जात असताना ही जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली. यात जीपचालक गणपत वागळे यांच्यासह साक्षी प्रशांत मोरे (वय १५), सेजल निलेश धनावडे (१४), वेदांत दिलीप सुर्वे (१५), सुमित रवींद्र मोरे (१६), यश हनुमंत धनावडे (१२), साक्षी हनुमंत धनावडे (१४), साक्षी विजय जाधव (१६), यश रवींद्र मोरे (१५) हे जखमी झाले. सर्व जखमींना महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती समजताच पालकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जखमीपैकी सुमित मोरे, सेजल धनावडे व साक्षी मोरे यांना पुढील उपचारासाठी वाई येथील खासगी रुग्णालयात पाठविले. याची पाचगणी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)एसटीच्या आगार व्यवस्थापकांना घेरावसमोरून आलेली बस अपघातास कारणीभूत असल्याची चर्चा शहरात सुरू झाल्याने संतप्त पालकांनी येथील बसस्थानकात गर्दी केली होती. युवासेनेचे व शिवसेनेचे पदाधिकारी विजय नायडू, शंकर ढेबे, सचिन वागदरे यांनी यासंदर्भात आगारप्रमुख रमाकांत शिंदे यांना घेराव घालत प्रश्नांचा भडिमार केला. स्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रज्ञा देशमुख हे कुमक घेऊन तत्काळ बसस्थानकात आल्या.