शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅक्सिन स्टोअरेज सिस्टीम संकल्पना आंतरराष्ट्रीय पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांच्या प्रकल्प संकल्पनेची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. या ...

यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांच्या प्रकल्प संकल्पनेची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. या प्रकल्पास पुढील संशोधनासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अ‍ॅन्ड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर्सकडून निधी प्राप्त झाला आहे. आयईईई रिजन १० एसएसी यांच्याकडून आयोजित केलेल्या स्पेशल कॉल फॉर कोविड-१९ रिलेटेड प्रोजेक्ट या स्पर्धेमध्ये अनेक देशांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. निवड झालेल्या या संकल्पनेमध्ये आय. आय. टी., एन. आय. टी. इन्स्टिट्यूटसोबत देश व परदेशांतील महाविद्यालयांचा समावेश आहे.

शरद इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्र राज्यातील एकमेव स्वायत्त संस्था आहे. बॉम्बे विभागांतर्गत शरदच्या 'डिझाईन अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट ऑफ आयओटी बेस्ड व्हॅक्सिंग स्टोअरेज सिस्टीम’ या प्रकल्प संकल्पनेची निवड झाली आहे. या सिस्टीममध्ये थर्मल एनर्जी स्टोअरेजचा वापर करून इनऑरगॅनिक आणि युटेक्टिक हे फेजचेंज मटेरिअल वापरण्यात येणार आहे. ज्यामुळे वीज नसतानाही पुढील सहा ते आठ तासांपर्यंत तापमान नियंत्रणात ठेवता येईल. ग्रामीण भागातील होणारे भारनियमन पर्यायाने लसींचे होणारे नुकसान या समस्येवर हे यंत्र अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

शरद इन्स्टिट्यूटमधील रोहित दायमा, रिया पाटील, संकेत बापट, अभिषेक भगाटे, श्रीनाथ भोई, नलिनी माने, श्रद्धा महाडिक या विद्यार्थ्यांनी ही संकल्पना मांडली आहे. त्यांना पुढील संशोधनासाठी चारशे यू.एस.डी. इतका निधी प्राप्त झाला आहे.

प्रा. अवेसअहमद हुसेनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प होत आहे. आयईईई स्टुडंट ब्रँचचे सल्लागार प्रा. मोहसिन मुल्ला यांच्यासह प्राचार्य डॉ. एस. ए. खोत, विभागप्रमुख डॉ. पी. एम. भागवत यांचे सहकार्य मिळाले. संस्थेचे अध्यक्ष राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.