शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतर्फे चार हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:16 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर गुरुवारी ४,३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कोविशिल्ड लस आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी एवढ्या ...

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर गुरुवारी ४,३५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कोविशिल्ड लस आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण झाले. आज, शुक्रवारी ज्यांना फोन येतील त्यांनीच केवळ लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी यावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

शहरात गुरुवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये ४५ वर्षांवरील १०० नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस व ४,२५० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे ३०३, राजारामपुरी येथे २७५, पंचगंगा येथे ५५२, महाडीक माळ येथे १८३, सदरबाजार येथे ६६७, फिरंगाई येथे ५५०, सिद्धार्थनगर येथे २४०, कसबा बावडा येथे ७१०, फुलेवाडी येथे ३४६, आयसोलेशन येथे ७४, मोरे मानेनगर येथे ४५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

महानगरपालिका मार्फत शहरात आतापर्यंत १ लाख २८ हजार ७४५ नागरिकांना पहिल्या डोसचे तर ५६ हजार १६५ नागरिकांना डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.

८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांचे आज लसीकरण -

कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील आणि ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशा नागरिकांनी आज शुक्रवारी महापालिकेच्या सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, महाडीक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सिद्धार्थनगर, मोरेमाने नगर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथे लसीकरण होणार आहे. ज्या नागरिकांना प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडून फोनद्वारे बोलविण्यात येईल अशा नागरिकांनी लसीकरण उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.